महाराष्ट्र

२० वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळला; सावत्र आई-वडील ताब्यात

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगर परिसरात २० वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. घरातील साहित्यासोबत मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा किंवा तो गुपचूप हलवण्याचा प्रयत्न सावत्र आई-वडील करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून घटनेचा तपास सुरू आहे.

नेमकी घटना काय?

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज परिसरातून एक कार घरगुती साहित्यासह निघाली होती. त्या कारमध्ये एक गादी संशयास्पदरीत्या गुंडाळलेली असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने पोलिसांनी वाहन अडवून तपासणी केली. गादी उघडून पाहिल्यावर त्यामध्ये २० वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आला.

या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ कार जप्त करून चौकशी सुरू केली. चौकशीत सावत्र आईने धक्कादायक माहिती दिली. तिच्या म्हणण्यानुसार, तरुणीचे प्रेमसंबंध होते आणि त्यातून तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. आम्ही केवळ अंत्यसंस्कारासाठी मृतदेह गावाकडे नेत होतो, असे तिने सांगितले. मात्र, कोणतीही कायदेशीर प्रक्रिया न करता मृतदेह गुपचूप हलवण्याचा प्रयत्न केल्याने संशय अधिक बळावला आहे.

आत्महत्या की घातपात?

वाळूज एमआयडीसी पोलीस ठाणे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत सावत्र आई आणि वडिलांना ताब्यात घेतले आहे. संशयास्पद मृत्यूची नोंद करून तपास सुरू करण्यात आला आहे.मृतदेह पोस्टमार्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून, अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.दरम्यान, या घटनेमुळे वाळूज परिसरात भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

11 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago