मुंबई: वंचित बहुजन आघाडीमधून भाजपमध्ये प्रवेश करणारे आमदार गोपीचंद पडळकर यांचा सतत राजकीय वर्तुळात गाजलेला प्रवास आता मनोरंजन विश्वातही दिसून येतोय. काही महिन्यांपूर्वी भाजपची “मैदानी तोप” म्हणून ओळख निर्माण केलेल्या पडळकरांनी आता गायक-अभिनेता गोपीचंद म्हणून नवीन ओळख प्रस्थापित केली आहे.
2 फेब्रुवारी रोजी त्यांनी आपलं नवीन गाणं “आमच्या नादाला लागण्याआधी… एकदा होळकरशाही आठवा” प्रदर्शित केलं. या गाण्यात पडळकर स्वतः मुख्य भूमिकेत आहेत, तर गाणं गायले आहे मिलिंद शिंदे यांनी. संगीत दिग्दर्शन मिलिंद शिंदे, शीतल साठे आणि अनिकेत मोहिते यांनी केलं आहे. गाण्याचे बोल सचिन माळी यांनी लिहिले आहेत. चाहत्यांचे मत आहे की पडळकरांचा पडद्यावरील अभिनय एखाद्या गुणी अभिनेत्यालाही टक्कर देतो.
गोपीचंद पडळकर कोण?
धनगर समाजाचे नेते आणि आरक्षणासाठी आंदोलन करणारे पडळकर यांनी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीपासून भाजपमध्ये प्रवेश केला. विधानसभा निवडणुकीत अजित पवारांकडून पराभव झाल्यानंतरही भाजपने त्यांना विधानपरिषदेत संधी दिली.
सोशल मीडियावर गाण्याची चर्चा
रिलीज झाल्यानंतर अवघ्या 24 तासांत या गाण्याला दीड लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून कार्यकर्त्यांनी कमेंट्समध्ये पडळकरांच्या या नवीन अंदाजाचे कौतुक केले आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…
१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…
लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…
नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…
चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…
राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…