मुंबई: मराठीतील पहिला रॅपर, निर्माता, दिग्दर्शक श्रेयश जाधव उर्फ ‘किंग जेडी’ याने अल्पावधितच सिनेसृष्टीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली.
मराठी प्रेक्षकांना जबरदस्त रॅप साँग, बाबू बँड बाजा सारखा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट, मी पण सचिन, बघतोस काय मुजरा कर, बस स्टॉप असे अनेक यशस्वी चित्रपट दिल्यानंतर आता श्रेयशचा प्रवास आणखी एक पाऊल पुढे गेला आहे. श्रेयशने ‘गणराज स्टुडिओ’ची स्थापना केली असून या अंतर्गत एडिटिंग, डबिंग, व्हीएफएक्स साउंड मिक्स अगदी फाइनल आउट्पुट्सपर्यंत सर्व पोस्ट प्रॉडक्शन सेवा उपलब्ध होणार आहे. नुकताच या स्टुडिओचा लोकार्पण सोहळा चित्रपट दिग्दर्शक अनिस बाझमी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी अभिनेता स्वप्नील जोशीसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
गणराज स्टुडिओच्या स्थापनेबाबत श्रेयश जाधव म्हणतो, ”गणराजचा प्रवास आता एक पाऊल आणखी पुढे गेला आहे. ‘गणराज स्टुडिओ’मुळे आता एकाच छताखाली चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध होणार आहेत. बेसलाइट २, डोल्बीअटमोस, ९.१ मिक्सिंग इत्यादी अत्याधुनिक सुविधासह इतक्या वर्षांच्या अनुभवातून दर्जेदार कलाकृतींची निर्मिती करण्याच्या दृष्टीने या स्टुडिओची स्थापना करण्यात आली आहे.”
शिरूर : भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे सभासदत्व शिरूर तालुक्यातील संबंधित ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावे, या…
मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ आणि…
जेवणावर सलाड च्या स्वरूपात खाल्ला जाणारा कांदा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. सॅन्डविच, सलाड किंवा…
हेपेटायटिस म्हणजे यकृतात हेपेटायटिस विषाणूचा (एचबीव्ही) संसर्ग होणे. हा विषाणू रक्त, असुरक्षित लैंगिक संबंध, दुसर्याने…
पणजी: देशात दोन विचारप्रवाह असून, एक विचार सर्व जाती-धर्मांना समान हक्क आणि अधिकार देणारा, स्त्री-पुरुष…
गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबत भौतिक सुविधा, संस्कार आणि राष्ट्रभक्तीवर भर; वरिष्ठ अधिकारी शाळांना देणार प्रत्यक्ष भेटी मुंबई…