मुंबई: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणारा अभिनेता रितेश देशमुख सध्या दोन कारणांमुळे चर्चेत आहे. एकीकडे तो ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असून त्याचा लूक समोर आला आहे; तर दुसरीकडे त्याने पत्नीच्या नावाबाबतचा गैरसमज दूर केला आहे.
रितेशची पत्नी जिनिलिया देशमुख हिला अनेकदा ‘जेनेलिया’ असे संबोधले जाते. मात्र एका मुलाखतीत रितेशने स्पष्ट शब्दांत सांगितले, “माझ्या बायकोचे नाव जिनिलिया आहे, जेनेलिया नाही.” यापूर्वीही त्याने सोशल मीडियावरून तिच्या नावाचा योग्य उच्चार सांगत चाहत्यांना दुरुस्ती केली होती.
२०१२ साली विवाहबंधनात अडकलेली रितेश-जिनिलिया ही जोडी चाहत्यांची लाडकी जोडी मानली जाते. जिनिलिया हिला ‘महाराष्ट्राची वहिनी’ म्हणूनही ओळखले जाते. नुकतेच तिने लग्नातील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यामुळे त्यांच्या लग्नाच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.
दरम्यान, रितेश आणि जिनिलिया शेवटचे वेड या चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई करत अनेक मराठी चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले होते. आता चाहते पुन्हा एकदा या जोडीला मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…