मनोरंजन

व्हॅलेंटाईन डे निमित्त श्वेता खरातची प्रेमाची कबुली; ‘A’ कोण? चाहत्यांमध्ये उत्सुकता

मुंबई: व्हॅलेंटाईन्स डे म्हणजे प्रेमाचा उत्सव. आजच्या या खास दिवशी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी आपल्या जोडीदारासाठी रोमँटिक पोस्ट शेअर करत प्रेम व्यक्त केलं. सोशल मीडियावर प्रेमाच्या कबुल्यांचा अक्षरशः वर्षाव पाहायला मिळाला.

गेल्या काही दिवसांत रेवती लेले, गायत्री दातार आणि ज्ञानदा रामतीर्थकर अशा अभिनेत्रीांनीही आपल्या नात्याची अधिकृत कबुली दिली होती. आता त्यांच्याच पाठोपाठ आणखी एका लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीबद्दल खुलासा केला आहे.

‘राजा राणीची गं जोडी’, ‘मन झालं बाजिंद’ आणि ‘पारू’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री श्वेता खरात हिने व्हॅलेंटाईन डे निमित्त सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत प्रेमाची कबुली दिली आहे. मात्र, तिने तिच्या बॉयफ्रेंडचा चेहरा अद्याप रिव्हिल केलेला नाही. इतकंच काय, त्याचं पूर्ण नावही जाहीर केलं नसून त्याचं नाव ‘A’ या अक्षरावरून सुरू होत असल्याचं तिने नमूद केलं आहे.

श्वेताची भावुक पोस्ट

श्वेता तिच्या पोस्टमध्ये लिहिते,“एक क्षण असा होता… जेव्हा प्रेम वगैरे या सगळ्या गोष्टी खऱ्या वाटत नव्हत्या. जणू प्रेम सगळ्यांसाठी आहे पण, माझ्यासाठी नाहीये असा माझा समज झाला होता. पण हळूहळू गोष्टी बदलल्या. माझा देवावर विश्वास होता आणि मग अनपेक्षितपणे माझ्या आयुष्यात तुझी एन्ट्री झाली. तू माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी Blessing आहेस. तुझ्या प्रेमात मी फुलासारखी फुलत गेले… काही कथा आपण लिहीत नाही तर त्या देवाने आधीच लिहिलेल्या असतात. ‘व्हॅलेंटाईन्स डे’च्या खूप खूप शुभेच्छा माय डिअर लव्ह! माझ्या आयुष्यात तू नेहमीच खास राहशील. I love you ‘A’.”

ही पोस्ट शेअर होताच चाहत्यांसह अनेक मराठी कलाकारांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. कमेंट सेक्शनमध्ये अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आता श्वेताचा ‘A’ नेमका कोण आहे? ती त्याची ओळख अधिकृतपणे केव्हा करून देणार? याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

‘पारू’मधील खलनायिका अनुष्काची भूमिका गाजली

दरम्यान, श्वेताने ‘पारू’ मालिकेत अनुष्का ही खलनायिकेची भूमिका साकारली होती. तिच्या एन्ट्रीनंतर मालिकेत मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला होता. प्रेक्षकांनी तिच्या अभिनयाचं भरभरून कौतुक केलं. मात्र, कथानकाच्या मागणीनुसार अनुष्काचा मृत्यू दाखवण्यात आल्याने श्वेताची मालिकेतून एक्झिट झाली.

आता तिच्या वैयक्तिक आयुष्यातील या नव्या अध्यायामुळे चाहते अधिकच आनंदित झाले आहेत. ‘A’ची ओळख उघड होण्याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

7 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

15 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago