मनोरंजन

स्टार प्रवाह वर १६ फेब्रुवारीपासून मोठे बदल; ‘ठरलं तर मग’ आता पाऊण तास

मुंबई: मराठी छोट्या पडद्यावरील आघाडीची वाहिनी स्टार प्रवाह येत्या १६ फेब्रुवारीपासून आपल्या कार्यक्रमांच्या वेळापत्रकात मोठे बदल करत आहे. गेली तीन वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी ‘ठरलं तर मग’ मालिका आता अधिक वेळ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून तिच्या प्रसारणाच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.

‘ठरलं तर मग’ आता प्राइम स्लॉटमध्ये

टीआरपीच्या शर्यतीत कायम आघाडीवर असलेली ‘ठरलं तर मग’ मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री ८:४५ ते ९:३० या वेळेत प्रसारित केली जाणार आहे. म्हणजेच ही मालिका आता पाऊण तास चालेल. तर शनिवार-रविवारी मालिकेची वेळ नेहमीप्रमाणे रात्री ८:३० ते ९ अशीच असेल.

‘नशीबवान’ दुपारच्या स्लॉटमध्ये

आदिनाथ कोठारे यांची प्रमुख भूमिका असलेली ‘नशीबवान’ मालिका आतापर्यंत रात्री ९ वाजताच्या प्राइम स्लॉटला प्रसारित होत होती. मात्र १६ फेब्रुवारीपासून ही मालिका दुपारी २:३० वाजता दाखवली जाणार आहे. त्यामुळे रात्री ९ च्या स्लॉटमध्ये ‘ठरलं तर मग’ची एन्ट्री होणार आहे.

‘तू ही रे माझा मितवा’ची नवीन वेळ

‘तू ही रे माझा मितवा’ ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री ८:०० ते ८:४५ या वेळेत प्रसारित होईल. तर शनिवार-रविवारी ही मालिका रात्री ८:०० ते ८:३० या वेळेत ऑन एअर होणार आहे.

महिन्याभरात ‘तुझ्या सोबतीने’ची वेळ बदलली

जानेवारीतच सुरू झालेली ‘तुझ्या सोबतीने’ ही मालिका आधी रात्री १० वाजता प्रसारित होत होती. मात्र १६ फेब्रुवारीपासून ही मालिका रात्री ९:३० वाजता दाखवली जाईल.त्यामुळे रात्री १० वाजताच्या स्लॉटला ‘वचन दिले तू मला’ ही मालिका शिफ्ट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

१६ फेब्रुवारीपासूनचे नवे वेळापत्रक

तू ही रे माझा मितवा – ८:०० ते ८:४५ (सोम-शुक्र) | ८:०० ते ८:३० (शनि-रवि)

ठरलं तर मग – ८:४५ ते ९:३० (सोम-शुक्र) | ८:३० ते ९:०० (शनि-रवि)

नशीबवान – दुपारी २:३०

तुझ्या सोबतीने – रात्री ९:३०

वचन दिले तू मला – रात्री १० (शक्यता)

दरम्यान, जवळपास पाच मालिकांच्या वेळेत बदल केल्याने टीआरपीच्या गणितावर काय परिणाम होणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. तसेच रात्री ९ वाजताच्या स्लॉटमध्ये भविष्यात कोणती नवीन मालिका दाखल होणार, याकडेही प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

4 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago