मनोरंजन

गायक KK ने गर्लफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी केलं होतं ‘हे’ काम

मुंबई: आपल्या जीवनाचा काही भरवसा नसतो कधी कोण आपल्यामधून एक्झिट घेईल काही सांगता येत नाही. दरम्यानच्या काळात आपल्यामधून प्रसिद्ध गायक KK ने अचानक एक्झिट घेतली. तेव्हा सगळ्यांनाच प्रचंड मोठा धक्का बसला. ज्यांनी आपल्या गायनालाच आपला धर्म मानला. आणि आपल्या गायनानेच रसिकांचं भरभरुन प्रेम मिळवलं.

तुम्ही जर ९० च्या दशकातील पॉप गाणी ऐकत असाल तर तुम्ही KK चे ‘यारों.. दोस्ती.. बडी ही हसीन है’ ऐकलेच असेल. या गाण्याने त्या काळातील तरुणांना अक्षरशः वेड लावले होते. KK तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले होते. KK अशा मोजक्या गायकांपैकी होते. ज्यांनी गायनासाठी अक्ख आयुष्य पणाला लावलं. त्यांचा शेवटही एक गाण्याची कॉन्सर्ट दरम्यान झाला. केकेच्या आयुष्याविषयी कोणाला जास्त कल्पना नाही.

KK ने 1991 मध्येच त्याची गर्लफ्रेंड ज्योती कृष्णासोबत लग्न केले. KK ची प्रेमकहाणी इयत्ता 6 व्या वर्गात सुरु झाली. KK कॉमेडियन-होस्ट कपिल शर्माच्या शो ‘द कपिल शर्मा शो’ मधील गायक डॉ. पलाश सेन आणि शान यांच्यासोबत दिसला होता. या शो दरम्यान KK ने त्याच्या लव्ह लाईफबद्दल खुलासा केला. त्याने सांगितले होते की, ज्योतीशी लग्न करण्यासाठी त्याला सेल्सची नोकरी करावी लागली, कारण सासरच्या मंडळींना आपल्या मुलीचे लग्न एका बेरोजगार मुलासोबत करायचे नव्हते. केकेने सांगितले की मी ते विक्रीचे काम तीन महिने केले आणि नंतर सोडून दिले. तसेच बायक आणि वडिलांच्या पाठिंब्याने केके गायक बनू शकले.

KK ने 1991 मध्ये त्याची प्रेमिका ज्योती कृष्णाशी लग्न केले. लग्नानंतर त्यांना २ मुले झाली. १ मुलगा आणि १ मुलगी. त्यांच्या मुलाचे नाव नकुल कृष्ण कुननाथ आणि मुलीचे नाव तमारा कुननाथ आहे. नकुल देखील केके सारखा प्रतिभावान आहे आणि त्याने 2008 मध्ये वडिलांच्या ‘हमसफर’ अल्बममध्ये ‘मस्ती’ गाणे गायले होते. जोपर्यंत तमाराचा संबंध आहे, ती एक प्रशिक्षित पियानो वादक आहे. मात्र, या दोघांच्या कारकिर्दीबाबत अधिकृत माहिती नाही.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

5 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

5 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

5 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

5 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

6 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

6 तास ago