मनोरंजन

अपघातानंतर अभिनेत्री शिल्पा शेट्टीची झाली अशी अवस्था…

मुंबई: अभिनेत्री शिल्पा शेट्टीला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. तिने आपल्या अभिनयातून खूप नाव कमावलं आहे. ती आज लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करत आहे. तिने सिनेसृष्टीत एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट दिले आहेत.

शिल्पा शेट्टीने केला योगा
शिल्पा शेट्टीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती योगा करताना दिसत आहे. योगासने सुरु करण्यापूर्वी अभिनेत्री म्हणाली, ‘पाय तुटला आहे पण हिंम्मत नाही. योगा से ही होगा’ व्हिडिओ शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शन लिहिलं आहे की, ’10 दिवसांच्या विश्रांतीनंतर मला समजलं की स्ट्रेचिंग न करण्याचे कोणतंही कारण नाही.’

पाय तुटला पण हिंम्मत नाही
मला दुखापत झाली आहे पण मी नियमित व्यायाम करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानंतर मी पाश्र्वकोणासन आणि भारद्वाजसन योगासने पूर्ण केली. एवढंच नाही तर शिल्पाने पाठदुखीवर रामबाण उपाय सांगितला आहे. ती म्हणाली की, ‘ज्याला जमिनीवर बसता येत नाही तो खुर्चीवर बसून या भागांसाठी आसने करु शकतो. स्नायू मजबूत करण्यासाठी हे फायदेशीर आहेत.

शिल्पाचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्याला पाहून चाहते प्रतिक्रिया देत आहेत. वर्कफ्रंटवर बोलायचं झालं तर, अभिनेत्री रोहित शेट्टीच्या ‘इंडियन पोलिस फोर्स’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. आणि त्याच चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान तिचा पाय मोडल्याने तिला ब्रेक घ्यावा लागला. सध्या, चाहते तिची अशी अवस्था पाहून चिंता व्यक्त करत आहेत. तिला पुन्हा एकदा पडद्यावर पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत आणि ते तिला लवकरात लवकर बरं होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

3 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

3 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

4 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

4 तास ago