मनोरंजन

रागाच्या त्या एका क्षणाने संपला दिव्या शिंदेचा ‘बिग बॉस मराठी ६’चा प्रवास!

मुंबई: ‘बिग बॉस’च्या घरात भांडणं, वाद, तंटे हे नवीन नाहीत. मात्र फार क्वचित प्रसंगी हे वाद इतक्या टोकाला जातात की स्पर्धकाला थेट घराबाहेरचा रस्ता दाखवला जातो. ‘बिग बॉस मराठी’च्या आधीच्या सीझनमध्येही अशा घटना घडल्या आहेत.

दुसऱ्या सीझनमधील पराग कान्हेरेची हकालपट्टी, पाचव्या सीझनमधील आर्या जाधवचं बाहेर जाणं आणि आता सहाव्या सीझनमध्ये दिव्या शिंदेची एक्झिट या सगळ्यांच्या मुळाशी एकच कारण दिसतं, रागावर नियंत्रण न राहणं.

नेमकं घडलं काय?

घरात सुरू असलेल्या टास्कमध्ये एकमेकांच्या चेहऱ्यावर लाल रंगाची फुली मारायची होती. दिव्याचा आरोप आहे की अशा टास्कमध्ये तिला नेहमीच टार्गेट केलं जातं. त्यामुळे यावेळीही ती आधीपासूनच चिडलेली होती.

अशातच तन्वीने दिव्या बाहेरच्या गोष्टी घरात सांगते, तिला रात्री झोप लागत नाही आणि सकाळी तब्येतीची कारणं देते, असा आरोप केला. हे ऐकताच दिव्याचा संयम ढळू लागला. तरी सुरुवातीला तिने शांतपणे उत्तर देण्याचा प्रयत्न केला. मात्र तिचा बोलण्याचा आक्रमक सूर इतर सदस्यांना खटकू लागला, तरी बिग बॉसकडून तात्काळ हस्तक्षेप झाला नाही.

‘तो’ क्षण… आणि सगळं हातातून निसटलं

टास्कदरम्यान दिव्याच्या मनातली धुसफूस बाहेर आली. बोलता-बोलता तिच्या भाषेत तलवार चालवणं, जीवे मारण्याची धमकी देणं असे शब्द आले. रुचिताने तिला थेट विचारलं,

“तू धमकी देत आहेस?”

इथेच सगळं बिघडलं.

दिव्याने जर त्या क्षणी शांतता राखली असती, शब्द मागे घेतले असते किंवा अर्थ बदलून घेतला असता, तर परिस्थिती इतकी गंभीर झाली नसती. मात्र तिने,

“हो, ही धमकीच आहे!”

असं ठामपणे सांगितलं.

कन्फेशन रूममध्येही भूमिका बदलली नाही

यानंतर बिग बॉसने दिव्या आणि राकेशला कन्फेशन रूममध्ये बोलावलं. बिग बॉस आणि राकेशने तिला शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला, पण दिव्या ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती तिच्या भूमिकेवर ठाम राहिली.

खरं निर्णायक वळण तेव्हा आलं, जेव्हा कन्फेशन रूममधून बाहेर आल्यानंतर दिव्याने स्पष्ट शब्दांत सांगितलं,

“मी माफी मागणार नाही.”

इथेच सगळे पर्याय बंद झाले. एक साधी माफी, एक क्षणाचा संयम  कदाचित तिचा प्रवास पुढे गेला असता. पण तसं झालं नाही.

राग जिंकला, खेळ हरला

खेळात दिव्या कुठेतरी मागे होती, मात्र मोजक्या लोकांशी तिची चांगली नाती होती. त्यामुळे ती घरात टिकून होती आणि तिची दखल घेतली जात होती. मात्र रागाच्या त्या एका क्षणात संयम न राखता तिने बेफिकीरपणा दाखवला आणि अखेर ‘बिग बॉस मराठी ६’मधील तिचा प्रवास संपला.

‘बिग बॉस’मध्ये टास्क जिंकणं महत्त्वाचं असतंच, पण त्याहून महत्त्वाचं असतं — स्वतःवरचा ताबा.

दिव्याच्या बाबतीत, दुर्दैवाने, तोच तुटला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

19 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago