मनोरंजन

‘ठरलं तर मग’मध्ये व्हॅलेंटाईन स्पेशल! सायलीचं अर्जुनला भन्नाट सरप्राईज

मुंबई: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय ‘ठरलं तर मग’ मालिकेत सध्या नवनवीन ट्विस्ट्स पाहायला मिळत आहेत. सायली आणि अर्जुन यांनी एकमेकांच्या कामाची अदलाबदल केल्याने कथेला वेगळीच रंगत आली आहे. अर्जुन घराची जबाबदारी सांभाळताना दिसतोय, तर सायली ऑफिसमध्ये जाऊन काम करत आहे. या बदलामुळे दोघांच्या नात्यात हलकेफुलके, मजेशीर प्रसंग घडताना दिसत आहेत.

सायली आता अगदी अर्जुनसारखी वागताना दिसतेय. जसा अर्जुन ऑफिसमधून आल्यावर सर्वांसमोर ‘बायको-बायको’ करत लाडिकपणे बोलतो, तशीच सायलीही ‘नवरा-नवरा’ करत त्याला चिडवत आहे. त्यामुळे घरात हास्यविनोदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

दरम्यान, मालिकेत सध्या व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जात आहे. रोझ डेच्या दिवशी अर्जुन सायलीसाठी खास गुलाबांचा बुके आणतो; मात्र प्रिया तो बुके लपवते. रोझ डे सेलिब्रेशनच्या वेळी अर्जुनला बुके सापडत नाही. अशावेळी सायली त्याला मोठा बुके भेट देते. अर्जुनकडे देण्यासाठी काहीच नसल्याने तो मसाल्यातील चक्रीफुल (स्टार अॅनिस) सायलीला देतो. हा अनोखा गिफ्ट सायलीला प्रचंड आवडतो आणि दोघांच्या प्रेमळ क्षणांनी घरातील सगळेच आनंदी होतात. मात्र प्रिया आपला प्लॅन फसल्याने चिडलेली दिसते.

आता व्हॅलेंटाईन डे निमित्ताने मालिकेत आणखी एक खास क्षण दाखवण्यात येणार आहे. स्टार प्रवाहने शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये सायली अर्जुनला भन्नाट सरप्राईज देताना दिसते. अर्जुन स्वयंपाक करत असताना बाहेर गाडीचा हॉर्न वाजतो. ‘बायको आली’ असं म्हणत तो दार उघडतो, पण बाहेर कोणीच नसतं. अचानक एक भलामोठा पिंक टेडी त्याच्यासमोर येतो आणि त्यातून सायली बाहेर येते.

अर्जुन लाजत म्हणतो, “बायको, सगळे बघतायत ना…” त्यावर सायली मिश्कीलपणे उत्तर देते, “तुम्हीही मला असंच पेचात पाडता ना… आता कसं वाटतंय?” त्यावर अर्जुन म्हणतो, “बेस्ट वाटतंय!” आणि दोघेही एकमेकांना व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा देतात.

हा रोमँटिक प्रोमो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांनी कमेंट्समध्ये सायली-अर्जुनच्या जोडीचं भरभरून कौतुक केलं आहे. अनेकांनी हार्ट इमोजी शेअर करत “दोघे सोबत खूप छान दिसतात” अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत.‘ठरलं तर मग’मधील या प्रेमळ क्षणांमुळे प्रेक्षक पुन्हा एकदा या जोडीच्या प्रेमात पडले आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

3 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago