भविष्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: एका लहान प्रवासाची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या आणि तणावाची तसेच, आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारू शकते. धनलाभ होण्याची संभावना आहे.

वृषभ: आरोग्य आणि मनाची स्थिती सुधारु शकतो. कामाचा ताण कमी होण्यासह कर्जातून मुक्त होण्यासही मदत होऊ शकते. पैसा आणि करिअरची स्थिती ठीक राहील. कुटुंबात शांतता आणि संयम ठेवून वाद टाळण्याचा प्रयत्न करावा. आज आरोग्याची काळजी घ्यावी.

मिथुन: आर्थिक स्थिती सुधारु शकते. करिअरमधील समस्या हळूहळू सुटू शकतात. मात्र कामाचे थोडे दडपण राहू शकते. शिक्षण आणि स्पर्धांच्या बाबतीत कठोर परिश्रम करावे लागतील. आठवड्याच्या शेवटी महत्त्वाच्या प्रवासाची शक्यता आहे.

कर्क: दिवसाच्या सुरुवातीला तणाव जाणवू शकतो. करिअर आणि नातेसंबंधात अडचणी येण्याची संभावना आहे. मात्र, तुम्ही हुशारीने परिस्थिती हाताळू शकता. आठवड्याच्या मध्यापासून पैसा आणि करिअरची स्थिती सुधारण्याची शक्यता आहे. मात्र एखादी भावनिक समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते.

सिंह: दिवसाच्या सुरुवातीला लाभाची शक्यता आहे. करिअर आणि कर्जाची स्थिती सुधारु शकते. आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक सदस्याबाबत काही चिंता सतावू शकते. आपला स्वभाव आणि बोलणे सांभाळावे.

कन्या: आरोग्य आणि मानसिक स्थिती सुधारु शकते. करिअर आणि पैशातील अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्ही नवीन कामाचा विचार करु शकता. घाईघाईने काम करणे आणि निर्णय घेणे टाळावे. वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करावा.

तूळ: कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि धावपळ वाढू शकते. आरोग्य चांगले राहून धनलाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याबाबत समस्या निर्माण होऊ शकतात.

वृश्चिक: आरोग्य आणि मानसिक स्थितीकडे लक्ष द्यावे लागू शकते. मात्र, हळूहळू परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. एकूणच करिअरची स्थिती चांगली राहील. वाहन किंवा मालमत्तेचा लाभ होण्याची संभावना आहे.

धनु: लाभदायक प्रवास होण्याची शक्यता आहे. व्यस्तता वाढेल, परंतु प्रत्येक परिस्थितीत फायदा होऊ शकतो. करिअरमध्ये काही सुधारणा होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्यावी.

मकर: मानसिक चिंता दूर होण्याची संभावना आहे. करिअर आणि पैशाची स्थिती सुधारु शकते. नवीन कामांना सुरुवात करु शकता. वाद टाळण्याच्या प्रयत्न करावा.

कुंभ: कामाचा ताण राहू शकतो. परंतु दिवसाच्या मध्यापासून स्थिती सुधारु शकते. शैक्षणिक स्पर्धेच्या बाबतीत यश मिळण्याची शक्यता आहे. विवाहाशी संबंधित गोष्टी मार्गी लावण्यासाठी ही योग्य वेळ सिद्ध होऊ शकते.

मीन: दिवसाच्या सुरुवातीला मन अस्वस्थ होऊ शकते. करिअर आणि कौटुंबिक बाबींमध्ये तणाव वाढू शकतो. दिवसाच्या मध्यापासून हळूहळू सुधारणा होण्याची संभावना आहे. आरोग्य सुधारु शकते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

8 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

12 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

13 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago