मुख्य बातम्या

लंडन येथील आंबेडकर हाऊस विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत; ॲड संग्राम शेवाळे

शिरुर (तेजस फडके) लंडन येथील आंबेडकर हाऊस विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत असुन अत्यंत बुध्दीवादी अर्थतज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ तसेच समाजसुधारक असलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या घराला भेट दिल्यानंतर समजते की अधुनिक भारताचे निर्माते डॉ. आंबेडकर आहेत का आहेत. भारतातून लंडनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने या हाऊसला भेट दिलीच पाहिजे. कारण शिक्षण कसे करावे हे समजून घ्यायचे असेल तर आंबेडकर हाऊस एक मुर्तीमंत उदाहरण आहे असे मत जनता दल युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष ॲड संग्राम शेवाळे यांनी लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेटदिल्यानंतर व्यक्त केले.

संग्राम शेवाळे यांनी नुकतीच लंडन येथील आंबेडकर हाऊस ऑफ लंडनला भेट दिली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले डॉ बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे संविधान पुरुष असुन त्यांनी आपले संपुर्ण आयुष्य गरीब, अस्पृश्य लोकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी वेचले. ज्यावेळी लंडनमधील डॉ. आंबेडकर यांच्या घराजवळ आपण पोहचलो, त्यावेळी अंगावर शहारे आले, छाती अभिमानाने भरून आली. सन १९२१,२१ या एक वर्षाच्या कालावधीत डॉ. आंबेडकर यांनी या ठिकाणी वास्तव्य केले. कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कुल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात त्यांनी पीएचडी पदव्या मिळविल्या. कायदा, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले.

पुढे बोलताना शेवाळे म्हणाले, आंबेडकर हाऊसमध्ये प्रवेश करताच डॉ. आंबेडकर यांचा पुतळा निदर्शनास आला. तेथे अभिवादन केल्यानंतर आजही जपलेले चष्मा, पेन, पत्रव्यवहार, महत्वाचे फोटो हे पहावयास मिळाले. तेथे एक वेगळीच उर्जा जाणवली. संग्राम शेवाळे हे लंडन या ठिकाणी क्वीन मेरी या संस्थेत न्याय व विधीचे शिक्षण घेत आहेत. भारतात येउन गरीब, वंचित लोकांसाठी काम करण्याची उर्जा या भेटीतून मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सावधान; स्वीट होम मध्ये मिठाई घेताय जरा जपुन,रांजणगाव येथील स्वीट होमच्या मिठाईत सापडली मेलेली अळी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) सध्या फास्ट फूड खाण्याच प्रमाण वाढलं असुन पुणे-नगर महामार्गाच्या येथे रस्त्याच्या…

10 तास ago

शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा भीषण स्फोट…

शिक्रापूर : शिक्रापूर-चाकण रस्त्यावर गॅस कंटेनरचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना आज (रविवार) पहाटे…

2 दिवस ago

माहेर संस्थेमुळे दोन मनोरुग्ण महिलांची कुटुंबासोबत भेट मृत समजुन एका महिलेचे केले होते धार्मिक विधी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) वढु बुद्रुक (ता. शिरुर) येथे मानसिक संतुलन हरवलेल्या दोन महिलांवर योग्य औषधोपचार…

2 दिवस ago

पुणे-सोलापूर महामार्गावर बँड पथकावर होर्डिंग कोसळल्याने एक घोडा जखमी

पुणे (प्रतिनिधी) सध्या राज्यात अवकाळी पाऊसामुळे अनेक ठिकाणी होर्डींग कोसळण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य…

2 दिवस ago

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

5 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

1 आठवडा ago