भविष्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज आपणाला अतिशय संवेदनशीलता जाणवेल. आज आपल्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. घर, जमीन इत्यादींशी संबंधित व्यवहार शक्यतो आज करू नयेत. मानसिक उद्वेग दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी आहे.
वृषभ: आज आपण अती संवेदनशीलतेमुळे व भावूक विचारांमुळे खूप हळवे व्हाल. आपली व इतरांविषयीची काळजी दूर झाल्यामुळे मनाला दिलासा मिळेल. कल्पनाशक्ति व सृजनशीलतेने काम कराल. कुटुंबीय व मित्रांसह स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. अचानकपणे प्रवास करावा लागेल. पैशाविषयी दक्ष राहून आर्थिक नियोजन यशस्वीपणे करु शकाल.
मिथुन: आज नातलग व मित्रांशी संवाद साधल्याने आपण आनंदित व्हाल. सुरवातीस आर्थिक नियोजनात काही अडचणी येतील. पण नंतर सहजपणे ते काम पार पाडू शकाल. महत्वाच्या कामाची सुरुवात उशीरा होईल पण नंतर मात्र सहजगत्या ती पार पडतील. त्यामुळे मनःशांती अनुभवू शकाल. नोकरी – व्यवसायातील वातावरण अनुकूल राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल.
कर्क: आज मित्र, स्वकीय व संबंधितांकडून भेट वस्तू मिळतील. त्यांच्यासह आपण आपला दिवस आनंदात घालवाल. प्रवास, मनपसंत भोजन व प्रिय व्यक्तीचा सहवास ह्यामुळे प्रफुल्लित राहाल. पत्नीच्या सहवासात मन प्रसन्न राहील.
सिंह: आज कोर्ट – कचेरीच्या प्रश्नात सावध राहावे लागेल. आज मनात भावनांचा कल्लोळ उठेल. त्यामुळे हातून काही अवैध कृत्य घडण्याची शक्यता आहे. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. उक्ती व कृती ह्यात समतोल साधावा लागेल. विदेशातून एखादी आनंददायी बातमी येईल. कायदेशीर गोष्टींचा निर्णय विचार पूर्वक घ्यावा.
कन्या: आजचा दिवस लाभदायी आहे. मित्रांसह एखादा आनंददायी प्रवास होईल. दांपत्य जीवनात जादा जवळीक निर्माण होईल. स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल. धनप्राप्ती साठी आजचा दिवस अनुकूल आहे. व्यापारातील पैसे मिळविण्यासाठी प्रवास करावा लागेल.
तूळ: आज आपणाला नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठांची आपल्यावर मर्जी राहील. कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल. मनात भावनात्मकता वाढेल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. जमीन व मालमत्तेचे व्यवहार यशस्वीपणे करु शकाल. आजचा दिवस व्यवसायात यश प्राप्तीचा आहे.
वृश्चिक: आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. लेखन – साहित्य संबंधित काम कराल. व्यवसायातील वातावरण आपणास प्रतिकूल असेल. वरिष्ठ आपल्यावर नाराज होतील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात. संततीशी मतभेद होतील. प्रवासाची शक्यता आहे. पैसा खर्च होईल.
धनु: आज आपणास खाण्या – पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. कामात यश मिळण्यास विलंब झाल्याने नैराश्य येईल. काम वेळेवर पूर्ण होणार नाही. कामाचा व्याप वाढेल. शक्यतो नवे काम घेऊ नये. प्रकृती भिघडण्याची शक्यता आहे. आपल्या बोलण्यावर संयम ठेवावा लागेल. खर्चात वाढ होईल.
मकर: दैनंदिन काम सोडून आज आपण मनोरंजन व गाठी भेटी ह्यात आपला वेळ घालवाल. मोठया धनलाभाची संभावना आहे. व्यापार वाढेल. भागीदारीतून लाभ होईल. दलाली, कमिशन, व्याज इत्यादीतून भरपूर प्राप्ती होईल. मान – सन्मान वाढतील.
कुंभ: सांप्रत काली आपणास कार्यात यश मिळाल्याने प्रसिद्धी सुद्धा मिळेल. स्वभावात जास्त हळुवारपणा राहील. घरात उत्साहाचे वातावरण राहील. नोकरीत सुद्धा सहकारी उत्तम सहकार्य करतील. शरीर व मन प्रसन्न राहील. कौटुंबिक वातावरण सुख – शांतीचे राहील.
मीन: आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी अनुकूलतेचा आहे. अभ्यासात यश व प्रगतीच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कल्पनाशक्तीच्या जोरावर साहित्य क्षेत्रात लेखनाचे नवे काम कराल.
शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

2 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

5 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

7 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago