शिरूर तालुका

सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा:- नाथा शेवाळे

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): राज्यात गेल्या अनेक दिवसांपासुन अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाले असल्याने शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जनता दल (सेक्युलर) चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

ऑक्टोबर महिना सुरु झाला तरी राज्यात पावसाने अजून माघार घेतलेली नाही. मुसळधार पावसामुळे राज्यातील शेतकरी बांधवांची कांदा, कापूस, सोयाबीन आणि इतर उभ्या पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले पिक नष्ट झाले आहे.

याबाबत राज्य सरकारने पाहणी करुन त्वरित पंचनामे करावेत. तसेच महाराष्ट्र राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जनता दल (से) महाराष्ट्र च्या वतीने शेवाळे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे लेखी निवेदन देऊन केली आहे.

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

35 मिनिटे ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

20 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

1 दिवस ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago