भविष्य

Horoscope Today: जाणून घ्या आपले आजचे राशीभविष्य

मेष: आजचा दिवस तुम्हाला चांगले अनुभव देईल. आज तुमच्या चांगल्या कृतींमुळे तुमचा व तुमच्या कुटूंबाचा अभिमान वाढेल. तुमचे नाव मोठे होईल. तुम्हाला निर्णय क्षमतेचा फायदा देखील मिळेल. धार्मिक कार्यात अधिक रस असल्याने, कदाचित तुम्ही आज काही विधी पूर्ण करण्याचा विचार करु शकता.

वृषभ: आज तुमचे मन आनंदित होईल. मुलाचे यश तसेच सर्वोत्कृष्ट आचरण पाहून तुम्हाला आनंद होईल. पालकांकडून आशीर्वाद घेऊन घराबाहेर पडा असे केल्यास एखादे काम मार्गी लागेल. नोकरदार लोकांना आनंद मिळेल आणि भौतिक सुविधा वाढतील. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील. संध्याकाळपासून ते रात्रीपर्यंत धार्मिक कार्यात घालवलेल्या वेळाने मनाला समाधान मिळेल.

मिथुन: आजचा दिवस तुमच्यासाठी खास असेल. जर एखादे प्रकरण किंवा इतर कोणतीही चौकशी चालू असेल तर आजचा काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. आज कोणत्याही बाबतीत त्वरीत निर्णय न घेतल्यामुळे कामात अडथळा व तोटा होईल. तुम्ही एखादे काम केल्याने अधिकाऱ्यांच्या कृपेने तुमचे कार्यक्षेत्र वाढू शकते.

कर्क: आज ऑफिसमध्ये पदोन्नतीबद्दल चर्चा होणार असेल तर ती पुढे जाऊ शकते. याखेरीज आज वक्तृत्व शैलीने तुम्ही एका मोठ्या अधिकारीला आकर्षित करण्यास सक्षम असाल. डोळ्याच्या विकाराशी संबंधित समस्या कमी होतील. निर्णय घेण्याची क्षमता फायदेशीर ठरेल.

सिंह: आज व्यावसायिकासाठी विशेष दिवस आहे. व्यवसायात काही नवीन आणि फायदेशीर बदल होऊ शकतात. जर नोकरी असेल तर तुमचे हक्क वाढतील, ज्यामुळे आर्थिक लाभ आणि सन्मान मिळेल. कौटुंबिक बाजूकडूनही चांगली बातमी येईल.

कन्या: आजचा दिवस तुमच्यासाठी खास आहे. आज तुमच्या हक्कात वाढ होण्याबरोबरच तुमच्या जबाबदाऱ्याही वाढतील. आज तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तसेच बराच काळ लटकलेली कामेसुद्धा मार्गी लागतील. आज त्या लोकांशी तुमची भेट होईल ज्यांना बर्‍याच दिवसांपासून भेटण्याचा तुम्ही प्रयत्न करत होतात.

hotel matoshree ranjangaon ganpati

तूळ: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रत्येक बाबतीत अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा आहे. नुकसान होण्याची शक्यता आहे. आज काही बाबतीत तुम्हाला सरकारी दंडही लागू शकतो. धोकादायक कार्यांपासून दूर रहा. वायु विकार शारीरिक अस्वस्थता वाढवू शकतात.

वृश्चिक: आज मौल्यवान वस्तूंमधून नफा मिळण्याची शक्यता आहे आणि आज तुमचे नशीब प्रत्येक बाबतीत तुमची साथ देईल. जर तुम्ही एखादे काम केले तर स्थान आणि अधिकार वाढतील. तुमच्या धैर्याने आणि पराक्रमासमोर शत्रूही अपयशी ठरतील. मुलांवर तुमचे प्रेम वाढेल.

धनू: आजच्या दिवशी तुमची काही कामे मार्गी लागतील जी तुम्ही बर्‍याच काळापासून करीत होता. या दिवशी तुम्ही जर गुरुप्रती निष्ठेची भावना ठेवली तर तुम्हाला लाभ मिळेल. आज अशा काही कल्पना तुमच्या मनात येऊ शकतात ज्या तुम्हाला आर्थिक फायदे देऊ शकतात. तुम्ही असे काही निर्णय घेऊ शकता जे भविष्यात फायदेशीर ठरतील. रखडलेले पैसे मिळतील.

मकर: आज पैशाबाबत तुम्ही चिंतीत असू शकतात. आज शारीरिक सामर्थ्य आणि उत्साहाने परिपूर्णता येईल, परंतु इच्छा नसतानाही सक्तीने अनावश्यक खर्च करावे लागतील. जर तुमची पदोन्नती थांबली असेल तर आज तुम्हाला चांगली बातमी मिळेल. संध्याकाळी मोठ्या प्रमाणात पैसे मिळाल्यामुळे आनंद होईल.

कुंभ: आज एखादी गोष्ट तुमचा मूड खराब करु शकते आणि तुम्ही रागावू शकता. घाईत कामं केल्याने नुकसान होऊ शकते म्हणून विशेष संयम बाळगा. भौतिक सुखसोयी वाढतील. नवीन कामांमध्ये देवाणघेवाण करायची असेल तर नक्कीच करा. भविष्यात फायदे होतील.

मीन: आज तुम्ही आरोग्याबद्दल चिंतीत असाल. पचनक्रिया मंद होऊ शकते आणि पोटात वायू संबंधित समस्या उद्भवू शकतात. जर तुम्हाला कोणत्याही वित्तीय संस्था किंवा व्यक्तीकडून कर्ज घ्यायचे असेल तर तुम्हाला ते सहज मिळेल. नवीन योजना बनवून त्यांना यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा. भविष्यात तुम्हाला चांगला आर्थिक लाभ मिळेल. तुमचा आत्मविश्वास आणि धैर्य वाढेल.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात विद्युत रोहित्र चोरट्यांच्या निशाण्यावर; रोहित्र फोडले अन्…

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना वीजपुरवठा करणारी विद्युत रोहित्रे आता चोरट्यांच्या निशाण्यावर…

1 दिवस ago

गोकुळच्या अध्यक्षपदासाठी सत्तेचा खेळ? संचालकांना परराज्यात नेल्याने वडेट्टीवार संतप्त

१० नोव्हेंबरच्या निवडणुकीत सर्व संचालकांना मतदानाची संधी द्या; सतेज पाटील यांच्या पाठीशी काँग्रेस ठाम मुंबई: गोकुळ…

2 दिवस ago

संसार दोघांचा, त्याग मात्र एकटीचाच का? कुंकवाचा मान राखता, मग स्त्रीच्या भावनांचा सन्मान कुठे

लग्न म्हणजे केवळ दोन जीवांचे मिलन किंवा दोन कुटुंबांचे नाते नाही, तर दोन व्यक्तींनी एकमेकांच्या…

2 दिवस ago

चित्रपताका मराठी चित्रपट महोत्सवाचे अधिकृत संकेतस्थळ सुरू; १५ नोव्हेंबरपासून प्रभादेवीत रंगणार चित्रपटांची मेजवानी!

नोंदणी शुल्क मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार; ३५ मराठी चित्रपट, ७ परिसंवाद, ४ विशेष मुलाखती आणि…

2 दिवस ago

राज्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाची चार विभागीय केंद्रे; आठ विद्यापीठांत उपकेंद्रे सुरू होणार

चंद्रकांतदादा पाटील यांचे तातडीने कार्यवाहीचे निर्देश; कुलगुरूंना जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुंबई : राज्यातील विद्यार्थ्यांना…

2 दिवस ago

मनसेचे प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश; भाजप, आपच्या पदाधिकाऱ्यांचाही पक्षप्रवेश!

राहुल गांधींचे हात बळकट करण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश; हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत टिळक भवनात पक्षप्रवेश सोहळा…

2 दिवस ago