रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्याचे पहिले आमदार तालुक्याचे सालकरी म्हणुन ओळखले जाणारे स्वर्गीय आमदार बाबुराव दौंडकर यांच्या कुटुंबातील व्यक्तीला आमदार बाबुराव स्मारक समितीमध्ये स्थान देण्यात यावे अशी मागणी करंजावणे ग्रामस्थांनी केली असुन आमदार बाबुराव दौंडकर स्मारक समितीचे पदाधिकारी स्वर्गीय आमदार बाबुराव दौंडकर यांच्या कुटुंबीयांचा कुठल्याही प्रकारचा सन्मान न ठेवता त्यांचा वारंवार अपमान करत असते. त्यांना समितीच्या कोणत्याही कार्यक्रमाला आमंत्रित केले जात नाही. तसेच आमंत्रण नसतानाही गेले असता त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला जात नाही. कार्यक्रमात जाणूनबुजून त्यांच्या कुटुंबीयांचा नामोल्लेख करणं टाळलं जातं असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
नुकताच १ जुलै रोजी स्वर्गीय आमदार बाबुराव दौंडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त तसेच बाबुराव दौंडकर स्मारक समितीच्या रौप्य महोत्सव निमित्त रांजणगाव गणपती येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करण्यात आलेले असताना बाबुराव दौंडकर यांचे कुटुंबीय तसेच करंजावणे ग्रामस्थ यांना कोणत्याही प्रकारचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. तरीही बाबुराव दौंडकर यांचे कुटुंबीय आणि करंजावणे ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमप्रसंगी बाबुराव दौंडकर यांच्या स्वर्गीय पत्नी बबई दौंडकर यांची प्रतिमा त्यांचा मुलगा ॲड्. प्रकाश दौंडकर यांनी स्मारक समिती मधील कार्यक्रमात बाबुराव दौंडकर यांच्या प्रतिमेशेजारी ठेवण्याचा प्रयत्न केला असता स्मारक समितीकडून त्यांची प्रतिमा बाजूला करण्यात आली. त्यामुळे आमदार बाबुराव दौंडकर स्मारक समितीकडुन आम्हाला जाणीवपूर्वक अपमानास्पद वागणुक देण्यात आली असा आरोप आमदार दौंडकर यांचे पुत्र ॲड्. प्रकाश दौंडकर यांनी केला.
माजी आमदार दौंडकर यांचे पुत्र ॲड. प्रकाश दौंडकर हे उच्चशिक्षित असून पोलीस उपनिरीक्षक या पदावरून निवृत्त झालेले आहेत. त्यांचे स्मारक समितीच्या विविध कार्यक्रमांमध्ये कायमच योगदान असते. त्याचप्रमाणे करंजावणे गावातील बाबुराव दौंडकर यांच्या पुतळ्याची देखभाल तसेच त्या ठिकाणी रंगरंगोटी आणि त्या ठिकाणी असणाऱ्या स्मारकाचा जिर्णोद्धार करण्याचं काम ॲड्. दौंडकर यांनी केलेले आहे. त्यांचा विविध प्रकारच्या सामाजिक कार्यामध्ये सहभाग असतो. गेल्या वर्षी दोन वेळा करंजावणे ग्रामस्थ व स्वतः ॲड्. प्रकाश बाबुराव दौंडकर यांनी बाबुराव दौंडकर स्मारक समितीच्या पदाधिकारी आणि सचिव यांच्याकडे त्यांना समितीमध्ये सदस्य म्हणून तरी घ्या अशी वारंवार विनंती केली होती. तशा प्रकारचा रीतसर लेखी अर्ज दोन वेळा केला. परंतु त्या अर्जाबाबत कोणत्याही प्रकारचे लेखी अथवा तोंडी उत्तर त्यांना देण्यात आले नाही. या अर्जाला समितीने कसलेच उत्तर दिले नसल्याने या अर्जावर जर समाधानकारक उत्तर न मिळाल्यास बाबुराव दौंडकर स्मारक समितीच्या प्रांगणात उपोषणाला बसणार असल्याचा इशारा बाबुराव दौंडकर यांचे पुत्र ॲड्. प्रकाश बाबुराव दौंडकर आणि करंजावणे ग्रामस्थ यांनी दिला आहे.
याबाबत बोलताना आमदार स्वर्गीय बाबुराव दौंडकर स्मारक समितीचे अध्यक्ष ॲड धर्मेंद्र खांडरे म्हणाले, १ जुलै रोजी आम्ही सर्व करंजावणे ग्रामस्थांना कार्यक्रमाचं निमंत्रण दिल होत. तिथं सर्व ग्रामस्थ उपस्थित होते फोटो बाबत असला कोणताही तिथं प्रकार झालेला नाही. तसेच ॲड्. प्रकाश दौंडकर यांचे सख्खे मेहुणे या ट्रस्ट वर गेले अनेक वर्ष अध्यक्ष होते. त्यांची सख्खी बहीण हि त्यांच्या कुटूंबातील नाही का…? तसेच त्यांच्या दोन व्यक्ती आधीच समितीमध्ये आहेत. आमदार स्वर्गीय बाबुराव दौंडकर स्मारक समिती हि एक चॅरिटेबल ट्रस्ट असुन तिचा कारभार कायद्याने चालतो. ट्रस्टमध्ये सगळ्यांच्या संमतीने निर्णय घेतले जातात. तसेच महात्मा गांधी यांच्या नावाने देशभरात अनेक ट्रस्ट आहेत. . त्यांचे कुटुंबीय आहेत का…? त्यामध्ये असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच गेली २५ वर्ष आम्ही हि ट्रस्ट चालवत असुन ज्यांनी ट्रस्ट साठी जागा दिली त्यांनीही कधी आम्हाला ट्रस्ट ,मध्ये घ्या असा आग्रह केलेला नाही असे त्यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” शी बोलताना सांगितले
शिरूर (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील कारेगाव (ता. शिरूर) येथील जयश्री फर्निचरच्या बाजूला असलेल्या लॉजिंगमध्ये सुरू…
शिरूर : शिरूर तालुक्यातील करडे घाटात दोन गुन्हेगार गटांच्या वादातून झालेल्या गोळीबारात विशाल सुनील काळे…
मुंबई: राज्याच्या सांस्कृतिक चळवळीला दिशा देणाऱ्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातील संचालकपद गेल्या दीड महिन्यांपासून रिक्त असल्याने…
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात एका प्रवासी युवतीवर 25 फेब्रुवारी 2025 रोजी…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…
मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…