भविष्य

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा रविवार किती स्पेशल असेल

मेष: माहीत नसलेल्या कामात लक्ष घालू नका. ठरवलेले विचार अचानक बदलू नका. वरिष्ठ अधिकार्‍यांचे सहकार्य लाभेल. उत्पन्नात वाढ होईल.

वृषभ: हातातील कामाला यश लाभेल. शेजार्‍यांची मदत घेता येईल. धन वृद्धीचे योग जुळून येतील. कौटुंबिक सौख्यात वाढ होईल. आरोग्यात सुधारणा दिसून येईल.

मिथुन: नवीन कामात हात घालू शकता. वडिलोपार्जित मालमत्तेतून लाभ शक्य. मुलांची एखादी कृती त्रस्त करू शकते. कौटुंबिक वातावरण जपावे. मनोबल वाढीस लागेल.

कर्क: काटकसरीपणाचा फायदा होईल. दुसर्‍याच्या स्वभावातील दोष दर्शवू नका. आजचा दिवस लाभदायक. ज्येष्ठ व्यक्तींचे अमूल्य सहकार्य लाभेल. कार्य शक्तीचे कौतुक केले जाईल.

सिंह: इतरांना सल्ला देण्याचे काम उत्तम करु शकाल. नेहमीसारखी आनंदी वृत्ती जागृत ठेवा. तुमच्या ज्ञानाच्या अनुभवाचे कौतुक केले जाईल. तुमच्या बोलण्याचा समोरच्यावर प्रभाव पडू शकेल. सारासार विचार लाभदायक ठरेल.

कन्या: आजूबाजूचे धूर्त लोक ओळखून रहा. लपवाछपवीच्या गोष्टी करू नका. धन संचयात वाढ होण्याची शक्यता. बचतीच्या योजना आखाल. मागे हटू नका.

तूळ: स्वत:च्या मतावर ठाम रहा. गोड बोलून कार्यभाग साधावा. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. कामात सुलभता जाणवेल. प्रलंबित योजना मार्गी लावाल.

वृश्चिक: आग्रहाला बळी पडू नका. मोठे काम करताना सावधानता बाळगावी. तीव्र इच्छा जागृत ठेवावी. वस्तु खरेदी करताना चोखंदळ रहा. अन्यथा नुकसान संभवते.

धनू: विद्यार्थ्यांना उत्तम काळ राहील. संमिश्र घटनांचा दिवस. कौटुंबिक प्रश्न प्राधान्याने सोडवा. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. क्षुल्लक गोष्टीने खट्टू होऊ नका.

मकर: नवीन कामात आळस करू नका. कौटुंबिक वातावरण शांत ठेवावे. योग्य संधीची वाट पाहावी. जोडीदाराचे मत मान्य करावे लागेल. कामाच्या स्वरुपात काहीसा बदल संभवतो.

कुंभ: मनातील विचार बोलून दाखवा. चुकीच्या विचारणा प्रयत्नपूर्वक दूर सारा. आर्थिक गोष्टींकडे कटाक्षपणे लक्ष द्या. विवाह इच्छुक असलेल्यांना शुभ वार्ता मिळेल. नेतृत्व गुण वाढीस लावा.

मीन: इतरांचे प्रेम संपादन करा. महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. उत्पन्नाच्या साधनात वाढ होईल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या संपर्कात याल. मुलांना नवीन संधि लाभू शकते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे पाण्यातून विषबाधा ९ शेळ्यांसह ५ मेंढ्यांचा मृत्यू…

शिरुर (अरुणकुमार मोटे) एकीकडे दुष्काळाच्या झळा तीव्र होत असताना शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथे तहानलेल्या शेळ्या…

2 तास ago

शिरुर लोकसभा मतदारसंघात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह कोणता झेंडा घेऊ हाती अशीच अवस्था

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) सर्वत्र लोकसभेची धामधूम सुरु असताना चौथ्या टप्प्यात शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान…

13 तास ago

Video; ट्रेलर बघताच आढळराव पाटलांची बोलती बंद असं का म्हणाले अमोल कोल्हे…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेच्या मतदारसंघात महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांमध्ये चांगल्याच शाब्दिक चकमकी रंगल्यात.…

14 तास ago

वाघाळे येथे वृद्ध महिलेला लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी एक जणावर गुन्हा दाखल

कारेगाव (प्रतिनिधी) वाघाळे (ता.शिरुर) येथील एका वृद्ध महिलेला मारहाण केल्याप्रकरणी गावातीलच भगवान दत्ताञय दंडवते यांच्यावर…

16 तास ago

Video; केंद्र सरकारने शेतक-याच्या ताटात माती कालवली; अमोल कोल्हे

शिरुर (तेजस फडके) केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी उठवली पण ४० टक्के निर्यातशुल्क आकारुन शेतक-याच्या ताटात…

16 तास ago

शिरूर तालुक्यातील दरोड्यादरम्यान महिलेचा खून; आरोपी गजाआड…

शिक्रापूर : जातेगावमध्ये (ता. शिरूर) ज्येष्ठ महिलेचा खून करून दागिने लुटणाऱ्या दरोडेखोरांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे…

23 तास ago