भविष्य

आपल्या राशीनुसार आपला दिवस कसा असेल जाणून घ्या….

मेष: आज तुमची तब्येत जरा नाजूक असेल. सर्दी पडश्याचा त्रास जाणवेल. आज तुम्ही एखाद्या गोष्टीचा फारच विचार कराल. एखादी क्षुल्लक गोष्ट मनाला लावून घ्याल. गोडबोल्या मंडळींपासून लांब रहा.:

वृषभ: आज अनावश्यक खर्चाचे प्रमाण फारच वाढेल. घरात थोर मंडळींशी काही वैचारिक मतभेद होतील. देण्याघेण्यात फसवणूक संभवते. मोठे आर्थिक व्यवहार आज टाळलेले बरे.

मिथुन: आज तुम्ही म्हणाल ती पूर्व करून दाखवाल. तुमच्यासाठी आज इच्छापूर्तीचा दिवस असून बऱ्याच दिवसांपूर्वीच्या तुमच्या काही इच्छा पूर्ण होतील. कर्ज मंजुरीतील अडथळे दूर होतील.

कर्क: आज उद्योगधंद्याच्या दृष्टीने पूर्ण अनुकूल दिवस असून नोकरीत तुम्हाला वरिष्ठांचे सहकार्य असेल. हाताखालचे लोक तुमच्याशी आदबीने वागतील आज तुम्ही फक्त आपल्या कर्तव्यास प्राधान्य द्याल.

सिंह: नोकरदारांनी नोकरीच्या ठिकाणी असलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. वरिष्ठ आपल्यावर खुश आहेतच अशा भ्रमात राहू नये. अति आत्मविश्वास नुकसानास कारणीभूत होईल.

कन्या: एखाद्या विश्वासू माणसाकडूनही आज विश्वासघात होऊ शकतो. कार्यक्षेत्रात सावधगिरी बाळगा. झटपट लाभाचा मोह टाळा. तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे.

तूळ: वैवाहिक जीवनात गोडी गुलाबी असल्याने आज तुम्हाला जोडीदाराकडे मन मोकळे करावेसे वाटेल. तरीही हातचे राखूनच बोला. तुमची काही गुपिते उघड होतील सतर्क रहा.

वृश्चिक: कोणतीही गोष्ट आज सहज साध्य नाही. बेरोजगारांना मात्र नोकरीसाठी संधी चालून येतील. वैवाहिक जीवनात थोडी धुसफुस संभवते. खाण्यापिण्यावर जरा ताबा ठेवा,पोट बिघडेल.

धनु: काही रसिक मंडळी आज कामे बाजूला ठेवूनही मौज मजेस प्राधान्य देतील. मुलांची अभ्यासातील प्रगती पाहून तुम्ही आनंदीत व्हाल. मुलांचे हट्ट हौशीने पुरवाल.

मकर: वाहन, वास्तू खरेदीसाठी टाकलेले कर्ज प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे. गृहिणी घर सजावटीच्या वस्तूंची खरेदी करतील. पालकांनी मुलांच्या अभ्यासात लक्ष घालणे गरजेचे आहे.

कुंभ: आज तुमचे मन थोडे चंचल राहील. अति उत्साहात काही चुकीचे निर्णय घ्याल व ते चुकतील. प्रवासात काही नव्हे हितसंबंध जुळून येतील. शेजाऱ्यांशी आपुलकी वाढेल.

मीन: आवक पुरेशी असली तरीही आज बचतीस प्राधान्य देणे हिताचे राहील. क्षुल्लक कारणांवरुन शेजाऱ्यांशी मतभेदाची शक्यता आहे. गोड बोलून आपला स्वार्थ साधून घ्या.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video; ससुनच्या डॉ अजय तावरेंनी आणखी एक चुकीचा अहवाल दिल्याचा शिरुरच्या मुलानी-शेख कुटुंबाचा गंभीर आरोप

शिरुर (तेजस फडके) पुणे पोर्शे अपघात प्रकरणात ससून रुग्णालयाचा भोंगळ कारभार (Pune Porsche car accident)…

17 तास ago

रांजणगाव MIDC मध्ये दोन युवकांना मारहाण करत दहशत पसरवुन दुचाकी जाळणाऱ्या आठ जणांविरोधात गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीत कारेगाव (ता. शिरुर) हद्दीतील बाजारतळा जवळील एका…

1 दिवस ago

शिरुर तालुक्यात बजरंग दलाच्या गोरक्षकांमुळे कत्तलीसाठी जाणाऱ्या पाच गोवंशांना जीवदान; तीन जणांवर गुन्हा दाखल

कारेगाव (तेजस फडके) कारेगाव येथील यश इन चौकात कत्तलीसाठी जाणाऱ्या 5 जनावरांना वाचविण्यात शिरुर तालुक्यांतील…

1 दिवस ago

शिरुर तालुक्यातील 33 शाळांचा इयत्ता 10 वीचा शंभर टक्के निकाल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील ३३ शाळांचा इयत्ता दहावीच्या मार्च 2024 च्या परीक्षेत ऑनलाईन निकाल…

3 दिवस ago

शिंदोडी येथे प्रशासन पाठमोरे होताच बेकायदेशीर माती उपसा पुन्हा सुरु; मस्तवाल मातीचोर कुणालाही घाबरेनात…

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी येथे सध्या शेतीच्या नावाखाली बेकायदेशीर मातीउपसा चालु…

3 दिवस ago

संकष्टी चतुर्थी निमित्त रांजणगावला भाविकांची अलोट गर्दी…

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे): अष्टविनायकापैकी एक असलेल्या श्री क्षेत्र रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील श्री…

4 दिवस ago