पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील बारा वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरण
शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या पुणे जिल्ह्यातील भाजपाच्या बड्या नेत्याच्या फार्म हाऊस वर एका बारा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडलेली असताना शिक्रापूर पोलिसांनी त्यातील आरोपीला अटक केले असता न्यायालयाने प्रथम 4 दिवस पोलीस कोठडी सुनावली होती, तर आह पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची रवानगी येरवडा कारागृहात केली आहे.
शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पुणे जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या एका बड्या नेत्याचे फार्म हाऊस असून सदर ठिकाणी काम करणाऱ्या एका कुटुंबातील बारा वर्षीय मुलीवर विशाल गायकवाड या युवकाने युवतीचे आई वडील बाहेर गेलेले असताना युवतीवर बळजबरीने बलात्कार करत युवतीच्या आई वडिलांना मारण्याची धमकी दिली होती.
याबाबत पिडीत युवतीच्या आई वडिलांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे येत याबाबत फिर्याद दिली असताना शिक्रापूर पोलिसांनी पोलिसांनी विशाल दामोदर गायकवाड (वय २१) सध्या रा. भाजप नेता फार्म हाऊस (ता. शिरूर) जि. पुणे मुळ रा. हळणी ता. अहमदपूर जि. लातूर याला गुन्हा दाखल होताच काही वेळात अटक केली. त्यानंतर राजकीय चर्चेंना मोठे वेग आले होते, तर भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी सदर गुन्हा फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केली होती.
शिरुर तालुक्यात अनेक राजकीय चर्चेंना उधाण आलेले होते. या गुन्ह्यातील आरोपी विशाल गायकवाड याची पोलीस कोठडी संपल्याने त्याला पुन्हा पुणे न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची येरवडा कारागृहात रवानगी केली आहे.
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…