Horoscope
मेष: आजचा दिवस संमिश्र पद्धतीचा असणार आहे. एखादी नवीन संधी चालून येण्याची शक्यता आहे. त्याचा पूरेपूर उपयोग करून घ्या. पैशांच्या बाबत अडचण जाणवेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. घरातील ताणतणावामुळे त्रस्त राहाल.
वृषभ: खूप दिवसांपासून अडकलेली कामे पूर्णत्वास घेऊन जाण्यास आज मदत मिळेल. कामात घाईगडबड न करता कामे पूर्ण कशी होतील याकडे जास्त लक्ष द्या. प्रिय व्यक्तीशी आदराने वागा. आई-वडिलांची साथ लाभेल. नोकरीच्या ठिकाणी सावधगिरीने वागा
मिथुन: आज नोकरीच्या ठिकाणी आपले काम उत्तम कसे आहे हे दाखविण्याची संधी मिळेल. आजचा तुमचा दिवस उत्साहात जाईल. मित्रपरिवारासह बाहेर जाता येईल.
कर्क: तुमच्या मित्रपरिवारामुळे तुमच्यावरील ताण कमी होईल. आई-वडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करु नका. प्रिय व्यक्तीशी वाद घालणे टाळा. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.
सिंह: आज घरातील मंडळींशी वाद होण्याची शक्यता आहे. प्रकृती बिघडेल पण योग्य वेळीच लक्ष द्या. आई-वडिलांशी प्रेमाने वागा. नोकरीच्या ठिकाणीसुद्धा कामे संयमाने पूर्ण करा. प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल.
कन्या: आज पैशांची भरभराट होईल. तुम्ही सर्व प्रकारचे आनंद घेण्यासाठी उत्सुक असाल. तसेच नोकरीच्या ठिकाणी कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्ती मात्र तुमच्या वागण्यामुळे खुश नसेल. जवळच्या व्यक्तीशी भांडण करणे टाळा.
तुळ: घरात भांडणे होण्याची शक्यता आहे. आपल्या रागावर नियंत्रण ठेवून समोरच्या व्यक्तीशी बोलावे. आई-वडिल यांच्या आज्ञांचे पाल करा. मित्रपरिवारासह बाहेर जाण्यासाठी वेळ काढा.
वृश्चिक: आजचा दिवस सुखाचा आणि समृद्धीचा जाणार आहे. कामात यश मिळून तुमचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्ती तुमच्यावर आज खुप खूश असेल. आई-वडिलांची साथ लाभेल.
धनु: विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम असेल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल.. घरातील मंडळींकडून कामाचे कौतुक केले जाईल. मित्रपरिवारासह बाहेर जाण्यास वेळ मिळेल.
मकर: आज पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. मित्र परिवारासह बाहेर जाण्याचा बेत करा. प्रिय व्यक्तींशी प्रेमाने वागा. परिवारातील मंडळींची साथ लाभेल.
कुंभ: आजच्या दिवशी आत्मविश्वासाच्या जोरावर कामे पूर्ण करता येतील. घरातील मंडळींकडे लक्ष द्या. घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेऊ नका. नोकरीच्या ठिकाणी कामे लक्षपूर्वक करा.
मीन: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साही असेल. प्रिय व्यक्तीकडून तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला जाईल. घरातील मंडळीना वेळ द्या. नोकरीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगा. हलगर्जीपणा करु नका.
पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधनावरील निर्यात शुल्कात वाढ; 3 ऑगस्टपासून नवे दर लागू, सर्वसामान्यांवरील किरकोळ…
मुंबई: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला आणखी एक राजकीय धक्का बसला आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघातून…
मुंढेंच्या वक्तव्याने नागपुरात संताप; आहारतज्ज्ञांनीही तेलाचे प्रमाण कमी ठेवण्याचा दिला सल्ला मुंबई: अन्न व औषध…
सुनेत्रा पवार यांना आयोगाचे पत्र; कलम ६, ७, १२, ३२ आणि ३६ मधील दुरुस्त्यांबाबत वैध…
वास्तुशास्त्रानुसार श्रावण महिन्यात शिवलिंग, शंख आणि गंगाजल घरात ठेवल्याने धार्मिक वातावरण निर्माण होते आणि सकारात्मकता…
मुंबई: जागतिक घडामोडींचा परिणाम पुन्हा एकदा सराफा बाजारावर दिसून येत आहे. अमेरिकेतील व्याजदरांबाबतच्या अपेक्षा, डॉलरमधील…