मुख्य बातम्या

शिरुर-चौफुला रस्त्यावर आंबळे येथे एस टी च्या धडकेत एकाचा मृत्यू

शिरुर (तेजस फडके) शिरुर-चौफुला रस्त्यावर गुरुवार (दि 6) रोजी रात्री 7:30 च्या सुमारास आंबळे गावच्या अलीकडे चासकमान कॅनॉलवर एस टी ने धडक दिल्याने महादेव ज्ञानोबा गाडेकर (वय ४०) मूळ रा. माजलगाव ता. माजलगाव जि. बीड सध्या रा. पांढरेवस्ती आंधळगाव ता. शिरूर जि. पुणे यांचा जागेवर मृत्यू झाला तर त्यांचा आठ वर्षाचा मुलगा आरोह हा जखमी झाला आहे. याबाबत सोनाली महादेव गाडेकर (वय ३०) यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महादेव ज्ञानोबा गाडेकर हे आंधळंगाव येथील पांढरेवस्ती येथे राहत होते.गुरुवार (दि 6) रोजी रात्री 7:30 च्या सुमारास आपला आठ वर्षाचा मुलगा आरोह गाडेकर याला घेऊन ते आपल्या मावशीच्या घरुन त्यांच्या होन्डा शाईन मोटार सायकलरुन आंधळगावकडे जात असताना आंबळेगावच्या अलीकडे चासकमान कॅनालवर आल्यानंतर समोरून आलेल्या एस टी क्रं एम एच 06 एम 8942 ने त्यांना जोरदार धडक दिल्याने महादेव गाडेकर यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांचा आठ वर्षाचा मुलगा आरोह हा जखमी झाला. याबाबत सोनाली महादेव गाडेकर यांनी शिरुर पोलिस ठाण्यात शिरुर आगाराचे एस टी चालक गोवर्धन जर्नादन तातखडे फिर्याद दाखल केली असुन शिरुर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक अनिल चव्हाण हे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

15 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

2 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

2 दिवस ago