भविष्य

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल…

मेष: आपला दिवस अस्वास्थ्य आणि त्रासात जाऊ शकतो. इतरांचे भले करण्याच्या नादात आपणावर आपत्ती येईल. पैशाच्या देण्या- घेण्याचे व्यवहार करु नका आणि कोणाला जामीन राहू नका. निर्णयशक्तीच्या अभावामुळे मनःस्थिती द्विधा होईल. त्यामुळे चिंता वाढतील. अधिक लाभाच्या हव्यासापोटी नुकसान होण्यापासून जपा.

वृषभ: आजचा दिवस शुभ फलदायी राहील. धनवृद्धी होईल आणि पदोन्नति मिळेल. व्यापारातील सौंदर्यामध्ये यश मिळेल. कुटुंबीय आणि मित्रांसमवेत आनंदाचे सुखद क्षण प्राप्त कराल. जवळचा प्रवास घडेल आणि नवीन संबंध प्रस्थापित होतील.

मिथुन: आजचा दिवस शुभ आणि अनुकूल आहे. सहकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध चांगले राहतील. सामाजिक दृष्टीने मान- सन्मान वाढेल. बढतीचे योग आहेत. तब्बेत चांगली राहील. प्रापांचिक जीवन आनंदपूर्ण राहील.

कर्क: आज आरामदायी दिवस आहे. प्रत्येक काम सहज पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खूश असतील बढती मिळू शकते. वरिष्ठ अधिकार्याबरोबर महत्वपूर्ण चर्चा होतील.

सिंह: आजचा दिवस तुम्हाला मध्यम फल देणारा जाईल. ठरविलेल्या कामाकडे लक्ष द्या. धार्मिक किंवा शुभ कार्यात आजचा दिवस जाईल. धार्मिक प्रवास घडतील. आज आपण रागात राहाल. ज्यामुळे मन अशांत होईल. संततीकडून काळजीत राहाल. तसेच व्यवसायात अडथळा येईल. परदेशातील आप्ताकडून बातम्या कळतील.

कन्या: आज नवीन कामाची सुरुवात करु नका. आरोग्य सांभाळा. बाहेरचे खाणे-पिणे टाळा. आज आपला स्वभाव रागीट असेल त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कुटुंबियासोबत रागात वागून मन दुःखी होणार नाही याची काळजी घ्या. खूप खर्च होईल. पाण्यापासून सांभाळा. सरकार विरोधी कृत्ये, भांडणे यापासून दूर राहा.

तुळ: आजचा आपला दिवस आनंदात जाईल. नवीन वस्त्र खरेदी कराल. तसेच वस्त्रालंकार वापरण्याचे प्रसंग येतील. शरीर आणि मन तंदुरुस्त राहील. लोकांमध्ये मान- सम्मान मिळेल.

वृश्चिक: आपल्या घरगुती जीवनात शांतीचे व आनंदाचे वातावरण राहील. तसेच आरोग्य चांगले राहील. आजारी माणसाच्या प्रकृतीत सुधारणा होईल. कार्यालयात सहकारी लोकांचे सहकार्य पूर्णपणे मिळेल.

धनू: संगतीचे आरोग्य आणि अभ्यास या संबंधी काळजी लागेल. कामे अयशस्वी झाल्याने निराशा येईल. म्हणून रागावर नियंत्रण ठेवा. साहित्य आणि कला याविषयी गोडी राहील. कल्पना जगात सैर कराल. प्रिय व्यक्तींच्या सोबत वेळ चांगला जाईल. तार्किक आणि बौद्धिक चर्चेपासून दूर राहा.

मकर: शारीरिक स्वास्थ्य आणि मनःस्थिती चांगली राहणार नाही. परिवारात संघर्षामुळे वातावरण खिन्न बनेल. शरीरात स्फूर्ती आणि उत्साहाचा अभाव जाणवेल. सामाजिक दृष्टीने अपमान होण्याची शक्यता आहे.

कुंभ: मानसिकदृष्टया खूप मोकळेपणा जाणवेल कारण मनातील चिंतेचे ढग दूर होतील. मनात उत्साह संचारेल. घरतील भावंडांबरोबर एखादे नवीन कार्य कराल आणि त्यांच्या सहवासात दिवस आनंदात जाईल. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल.

मीन: आज खर्चावर संयम ठेवण्याची सूचना देत आहेत. संताप आणि वाणीवर संयम ठेवा. पैशाच्या देवाण- घेवाणी संबंधी सावध राहा. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य साधारणच राहील. मनात नकारात्मक विचारांना थारा देऊ नका.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील…

शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच…

2 दिवस ago

‘आधी पाणी द्या, मग मत घ्या’ कान्हूर मेसाई येथे पाणी प्रश्नामुळे मतदानाची टक्केवारी घसरली…

कान्हूर मेसाई (सुनिल जिते) लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात शिरूर मतदार संघासाठी सोमवारी मतदान झाले. कान्हूर…

5 दिवस ago

तळेगाव ढमढेरे ते एल अँड टी फाटा रस्त्यावरील ‘ते’ बॅनर ठरत आहेत चर्चेचा विषय

तळेगाव ढमढेरे (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे गावातील अतिशय महत्त्वाचा तसेच वर्दळीचा आणि पुणे-नगर…

5 दिवस ago

Video; तळेगाव-न्हावरे रस्त्यावर नियंत्रण सुटल्याने मालवाहू ट्रक उलटला; चालक गंभीर जखमी…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील तळेगाव-न्हावरे रस्त्यावर (NH548D) न्हावरेच्या बाजुने तळेगाव ढमढेरेच्या दिशेने जाणारा भरधाव…

5 दिवस ago

आज दिवसभर प्रेक्षकांना ZEE TV वर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ चित्रपटाची पर्वणी

शिरुर (तेजस फडके) आज (दि 12) मे रोजी दिवसभर झी वाहिनीच्या विविध चॅनलवर स्वराज्याचे दुसरे…

6 दिवस ago

जेव्हा सगळे शेपूट घालुन बसले होते. तेव्हा हा पठ्या भांडलाय तुमच्यासाठी; डॉ कोल्हे यांचा अजित पवारांना टोला

शिरुर (तेजस फडके) ज्या भारतीय जनता पक्षाची तळी घेऊन आता तुम्ही एका शेतकऱ्याच्या पोराला पाडायला…

1 आठवडा ago