Adhalrao Patil Amol Kolhe
शिरूर लोकसभा निवडणूकसाठी मतदार पार पडले असून, ठिकठिकाणी चर्चांना उधाण आले आहे. अमोल कोल्हे पाच वर्षांत कधी मतदार संघात फिरले नसल्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा मार्ग मोकळा तर आढळराव पाटील यांनी पक्ष बदलल्यामुळे पुन्हा एकदा अमोल कोल्हे हेच खासदार होणार असल्याच्या चर्चा आहेत. पण, 2019 च्या तुलनेत यंदा मतांची टक्केवारी पाच टक्क्यांनी घसरली असून त्याचा फटका कुणाला बसणार हे 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना आव्हान देत, शिरूर लोकसभेची निवडणूक प्रतिष्ठेची केली. शिरूर लोकसभेतून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांना संधी दिली. तर कोल्हे यांना दुसऱ्यांदा खासदार होऊ न देण्याचा चंग बांधलेल्या अजित पवार यांच्यावर उमेदवार आयात करावा लागला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर समर्थक आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना घड्याळाच्या चिन्हावर उतरविण्याची ‘वेळ’ अजित पवार यांच्यावर आली.
…म्हणून कोल्हे येणार
शिवाजीराव आढळराव पाटील हे पक्ष बदलून निवडणूकीला सामोरे गेल्यामुळे कोल्हे यांचा विजय अगजीच सोपा झाला. खरंतर आढळराव पाटील यांच्यामुळेच कोल्हे निवडूण येणार आहेत. कोल्हे यांच्या विरोधात दुसरा कोणताही उमेदवार असला असता तरी कोल्हे शंभर टक्के पडले असते. पण, आढळराव पाटील यांच्यामुळे कोल्हे १०० टक्के विजयी होणार म्हणजे होणारच, अशा चर्चा ऐकायला मिळत आहेत.
…म्हणून आढळराव येणार
अमोल कोल्हे यांनी गेल्या पाच वर्षांत मतदार संघाकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिक त्यांच्यावर नाराज आहेत. शिवाजीराव आढळराव पाटील यांचा थेट नागरिकांशी संपर्क आहे. नागरिकांचा फोन कधीही उचलून अडचणी जाणून घेतात. यामुळे नागरिकांच्या मनातील खासदार असल्यामुळे नक्कीच विजयी होणार. शिवाय, केंद्रापासून ते महाराष्ट्रातील नेते त्यांच्या पाठीशी उभे राहिल्यामुळे विजय सोपा झाला आहे, अशी चर्चा ऐकायला मिळत आहे.
पण पडणार कोण?
दोन्ही नेत्यांकडे काही जमेच्या तर काही कमजोर बाजू आहेत. पण, शरद पवार यांना माणनारा एक वेगळा वर्ग असल्यामुळे कोल्हे यांना फायदा होणार आहे. दुसरीकडे आढळराव पाटील यांनी पक्ष बदलल्यामुळे पक्षांतर्गत नाराजी पाहायला मिळाली. आढळराव पाटील हे स्वतः चांगले नेते आहेत. पण, आपण त्यांचा प्रचार केला तर क्रेडीट दुसऱ्या कोणाला मिळणार आहे, त्यामुळे अनेकांनी खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, अशी भूमिका घेतल्यामुळे फटका बसणार आहे. पण, मोठी ताकद मिळाल्यामुळे विजय सुद्धा सोपा होऊ शकतो, असेही अनेकांचे मत आहे.
मतदानात घट…
2019 ला 60.62 टक्के झालेलं मतदान 2024 ला 54.16 येऊन ठेपलं. म्हणजे थेट पाच टक्क्यांनी मतांची घसरण झाली. लोकसभेतील सहा विधानसभांमध्ये 2019 साली आणि यंदा मतदानाच्या टक्केवारीत चांगलाच बदल झाला. अमोल कोल्हे यांना 2019 साली जुन्नर विधानसभेतून 41 हजार 551 मतांची आघाडी मिळाली होती. पण यंदा जुन्नर विधानसभेत 6.49 टक्के मतदान कमी झाले आहे. शिवाजीराव आढळराव यांचा बालेकिल्ला असलेल्या आंबेगावमधून 25 हजार 697 अधिकची मतं कोल्हे यांना मिळाली होती. पण यंदा इथून 7.18 टक्क्यांनी मतदान घटले आहे. खेड-आळंदी विधानसभेत ही 7 हजार 446 मतांचं कोल्हेंना लीड होते. तिथं ही 4.44 टक्क्यांची घसरण आहे. तसेच शिरूर विधानसभेतूनही 26 हजार 305 मतांनी कोल्हे यांची आगेकूच कायम होती. पण इथं ही यंदा 4.54 टक्के मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली आहे.
भोसरी आणि हडपसरमध्ये शिवाजी आढळरावांना अनुक्रमे 37 हजार 77 आणि 5 हजार 370 मतांची आघाडी होती. मात्र या विधानसभांपैकी हडपसरमध्ये 8 टक्के मतांची टक्केवारी खालावली. फक्त अन् फक्त भोसरी विधानसभेत अवघं 0.13 टक्के इतकीच मतं कमी झालीत. 2019 आणि 2024 या दोन्ही लोकसभांची टक्केवारी पाहता, खालावलेली टक्केवारी कोणाचं टेन्शन वाढवणार आणि कोणाला फायद्याची ठरणार यावरून अनेक राजकीय तज्ज्ञ आपापली मतं नोंदवत आहेत.
दरम्यान, मतदानाचा टक्का घसरला की चिंता ही सत्ताधाऱ्यांची वाढते असा आजवरचा अनेकांचा अभ्यास सांगतो. त्यानुसार अमोल कोल्हे सलग दुसऱ्यांदा शिरूर लोकसभेचा घाट गाजवतील आणि दिल्लीत तुतारी फुंकतील असे बहुतांश राजकीय अभ्यासकांचे मत आहे. दुसरीकडे, शिवाजीराव आढळराव पाटील खासदारकीचा चौकार निश्चितपणे मारतील. पण, कोण मारणार बाजी? अमोल कोल्हे की शिवाजीराव आढळराव पाटील हे 4 जून रोजी स्पष्ट होणार आहे.
Video; गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय, पाबळच्या युवकाने आढळराव यांना पाणी प्रश्नावर घेरलं…
शिरुरमध्ये ‘ह्याला आम्ही पाडणार, गद्दारांना गाडणार’ असा मजकुर टाकत आढळराव यांच्या विरोधात बॅनरबाजी
शिरूरमधील राजकारण तापलं! आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना फटकारलं…
Video; कितीही रडीचे डाव खेळा,येणार तर दणकून येणार, अन जनतेतून येणार; डॉ अमोल कोल्हे
Video; केंद्र सरकारने शेतक-याच्या ताटात माती कालवली; अमोल कोल्हे
– संतोष धायबर
santosh.dhaybar@gmail.com
शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पुणे-नगर महामार्गावर अपघातांची मालिका काही केल्या थांबत नसुन शिक्रापुर (ता. शिरुर) येथील…
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…