मुख्य बातम्या

शिरूर तालुक्यातील त्या बहुचर्चित ड्रग्स प्रकरणातील एकूण पाच आरोपी गजाआड

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील तरुणाईला पोखरणाऱ्या एमडी ड्रग्जच्या वाढत्या विळख्याला अखेर पोलिसांनी मोठा धक्का दिला असून, या प्रकरणात आतापर्यंत पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे संपूर्ण पुणे ग्रामीणसह अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ उडाली असून, ड्रग्स रॅकेटचे धागेदोरे अनेक तालुक्यांपर्यंत पसरले असल्याचे तपासातून समोर येत आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये

१) शहादक शेख (रा. शिरूर),

२) श्यामसुंदर गुजर (पोलीस हवालदार),

३) माऊली उर्फे ज्ञानदेव शिंदे (रा. कुरुंद, हमालवाडी, ता. पारनेर, जि. अहिल्यानगर),

४) महेश गायकवाड (रा. हिंगणी, ता. श्रीगोंदा, जि. अहिल्यानगर)

५) त्रषिकेश चित्तर (रा. कुरुंद, हमालवाडी)

यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या पैकी काही आरोपी हे थेट ड्रग्स विक्री करणारे साथीदार असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणाला अधिक गंभीर वळण देणारी बाब म्हणजे माऊली शिंदे याचा भाऊ हनु शिंदे याचा संशयास्पद सहभागअसल्याची खात्रीलायक माहीती सुत्रांनी दिली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हनु शिंदे याच्यावर गुजरात राज्यात अवैध दारू विक्री व वाहतूक प्रकरणी गुन्हा दाखल असून, तो जेलवारी करून आलेला आहे. त्याच्यावर यापूर्वीही अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, हनु शिंदे व अटक आरोपी पोलिस हवालदार श्यामसुंदर गुजर यांच्यात अवैध धंद्यांबाबत अनेक वेळा संपर्क झाल्याचेही तपासात पुढे येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, हनु शिंदे हा अनेक ड्रग्स माफियांच्या संपर्कात असून, तो या रॅकेटचा महत्त्वाचा दुवा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या त्याचा मोबाईल फोन बंद येत असून, तो फरार झाल्याचीखात्रीलायक माहिती मिळाली आहे. श्यामसुंदर गुजरात हा पारनेर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असताना अवैध धंद्यांच्या माध्यमातून त्याचा कुरुंद येथील शिंदे बंधूंशी संबंध आला. व त्याने थेट शिंदे बंधूंच्या माध्यमातून ड्रग्ज विक्री व इतर काळे धंदे केले आहे. शिरूर हद्दीपासून कुरुंद ( ता. पारनेर ) हे फक्त नदीपलीकडचे गाव त्यामुळे शिंदे बंधू ड्रग्स विक्रीसाठी शिरूर मध्ये येत असे.

दरम्यान, श्रीगोंदा तालुक्यातील देवदैठण, हिंगणी, ढवळगाव या भागांतील काही तरुण शिरूरमध्ये येऊन एमडी ड्रग्जची विक्री करीत असल्याची धक्कादायक माहिती स्थानिक सुजाण नागरिकांनी दिली आहे. या तरुणांमार्फत शिरूर शहरासह ग्रामीण भागातही एमडी ड्रग्ज सहज उपलब्ध होत असल्याने, तरुण पिढी वेगाने या नशेच्या गर्तेत अडकत चालली आहे.

शिरूर परिसरात एमडी ड्रग्जचा वाढता प्रादुर्भाव ही केवळ कायदा-सुव्यवस्थेची नव्हे, तर सामाजिक आरोग्याची गंभीर समस्या बनली आहे. शिक्षण घेणारे विद्यार्थी, कामगार वर्गातील तरुण, अगदी अल्पवयीन मुलेही या नशेच्या आहारी जात असल्याचे चित्र भयावह आहे. एकदा एमडी ड्रग्जच्या सवयीला लागल्यावर तरुणांचे आयुष्य, कुटुंब आणि भविष्य उद्ध्वस्त होत असल्याची उदाहरणे दिवसेंदिवस वाढत आहेत.

यामुळे पालकांनी आपल्या मुलांच्या हालचालींवर लक्ष ठेवणे, त्यांच्या मित्रपरिवाराची माहिती घेणे आणि संशयास्पद बदल आढळल्यास वेळीच समुपदेशन व पोलिसांची मदत घेणे अत्यंत गरजेचे बनले आहे. तसेच, पोलिस प्रशासनानेही या रॅकेटची मुळे पूर्णपणे उखडून टाकण्यासाठी कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.

या प्रकरणाचा तपास सुरू असून, आणखी काही मोठी नावे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. शिरूर तालुक्याला ड्रग्समुक्त करण्यासाठी ही कारवाई निर्णायक ठरेल, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

14 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

15 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

15 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

15 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

15 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

15 तास ago