महाराष्ट्र

नामांकित शाळेच्या बसमध्ये 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; बस चालक अटकेत

शाळा प्रशासनावर गंभीर आरोप

बदलापूर: बदलापूरमध्ये पुन्हा एकदा माणुसकीला काळीमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. बदलापूर पश्चिमेकडील एका नामांकित खासगी शाळेच्या बसमध्ये अवघ्या 4 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे महिला आणि बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

बसमध्येच घडला घृणास्पद प्रकार

पीडित मुलगी नर्सरीत शिक्षण घेत असून रोज शाळेच्या बसने प्रवास करत होती. याच प्रवासादरम्यान बस चालकाने तिच्यासोबत गैरकृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. काही दिवसांपासून मुलीच्या वागण्यात झालेला बदल लक्षात आल्यानंतर पालकांनी तिला विश्वासात घेतले असता हा प्रकार उघड झाला.

तक्रारीनंतरही शाळेची उदासीन भूमिका

पालकांनी तातडीने शाळा प्रशासनाकडे तक्रार केली असता, मदत करण्याऐवजी मुख्याध्यापिकेने चक्क बस चालकाची पाठराखण केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. शाळा प्रशासनाने या गंभीर प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप करण्यात येत आहे.

ड्रायव्हर पाहताच चिमुरडी घाबरली

मुख्याध्यापिकेकडून दाद न मिळाल्याने पालकांनी शाळेतच बस चालकाला बोलावले. चालक समोर येताच ती 4 वर्षांची चिमुरडी प्रचंड घाबरली आणि पालकांच्या मागे लपली. हा प्रसंग पाहून पालकांना तिच्यासोबत गंभीर अन्याय झाल्याची खात्री पटली.यानंतर पालकांनी थेट पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी बस चालकाला अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

नियमांची पायमल्ली: बसमध्ये महिला अटेंडंट नाही

या घटनेमुळे राज्य सरकारच्या स्कूल बस नियमावलीचा फज्जा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे. नियमानुसार स्कूल बसमध्ये महिला अटेंडंट असणे बंधनकारक असताना, संबंधित बसमध्ये कोणतीही महिला कर्मचारी नव्हती. शाळेच्या या हलगर्जीपणामुळेच आरोपी चालकाला मोकळे रान मिळाल्याचे बोलले जात आहे.

गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रतिक्रिया

दरम्यान, या घटनेवर प्रतिक्रिया देताना गृहराज्यमंत्री पंकज भोयर म्हणाले,मानसिक विकृतीतून अतिशय निंदनीय अशी घटना बदलापूर येथे घडली आहे. स्कूल वाहनचालकाने शाळकरी मुलीवर चुकीचे कृत्य केल्याचे निदर्शनास आले असून, पोलिसांनी संबंधित व्यक्तीला अटक केली आहे. शाळा प्रशासनाला याआधीच शालेय शिक्षण विभागामार्फत मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘मतदारांची नावे वगळल्याचा’ आरोप; ज्ञानेश कुमार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेसचे २८ सप्टेंबरला राज्यभर आंदोलन

मुंबई: निवडणूक आयोगाच्या कारभारावर गंभीर आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या बडतर्फी…

14 तास ago

मोतीबन-कोठारी परिवार म्हणजे एकत्र कुटुंब, आदर्श कुटुंब!

एकत्र आणि मोठे कुटुंब असणे ही केवळ संख्येची बाब असते; मात्र त्या मोठ्या कुटुंबातील माणसांची…

15 तास ago

राज्यातील २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; विविध सवलती लागू

मुंबई: खरीप २०२६ हंगामातील पर्जन्यमानातील तूट आणि अन्य दुष्काळी निकषांच्या आधारे राज्यातील तब्बल २६५ तालुक्यांमध्ये…

15 तास ago

अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी काँग्रेसची निवडणूक समिती जाहीर; ११ जणांवर जबाबदारी

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काँग्रेसने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. अमरावती विभाग…

15 तास ago

शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारा मदतीचा जीआर; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

चंद्रपूर: राज्य सरकारने दुष्काळ दौऱ्याचा मोठा गाजावाजा केला. मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची आश्वासने…

16 तास ago

दुष्काळ जाहीर करून चालणार नाही; हेक्टरी १ लाख रुपये तातडीने खात्यात जमा करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यातील ७५ टक्के भागात सरकारने दुष्काळ जाहीर केला असला तरी शेतकऱ्यांना ठोस आणि भरीव…

16 तास ago