मुख्य बातम्या

शिरुर तहसिल अभिलेख शाखेतील संशयित बोगस नोंदी प्रकरणी प्रशासनाची उदासीनता; आत्मदहनाचा इशारा

शिरुर (तेजस फडके): शिरुर तहसिल कार्यालयाच्या अभिलेख शाखेत संशयित बोगस नोंदी असल्याचा गंभीर आरोप करत शिरुर शहरातील सामाजिक कार्यकर्ते शैलेश जाधव यांनी या नोंदींची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्याची लेखी मागणी तहसिलदारांकडे दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी केली होती. त्यानंतर २४ डिसेंबर २०२५ रोजी संबंधित नोंद बोगस असल्याचा संशय व्यक्त करत स्वतंत्र तक्रार अर्जही सादर करण्यात आला होता.

या पुढे, दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी सदर संशयित नोंद शासकीय प्रयोगशाळेत शाई व अक्षर तपासणीसाठी (Forensic Examination) पाठविण्यात यावी, अशी स्पष्ट मागणी लेखी स्वरूपात करण्यात आली. मात्र या तक्रारीस जवळपास वीस दिवसांचा कालावधी उलटूनही शिरुर तहसिल प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई, चौकशी किंवा हालचाल झाल्याचे अद्याप दिसून आलेले नाही.

दरम्यान, या संशयित बोगस नोंदी प्रकरणाशी संबंधित एका महिलेने व सामाजिक कार्यकर्ते शैलेश जाधव यांनी, जर एका महिन्याच्या कालावधीत योग्य ती चौकशी व कारवाई करण्यात आली नाही, तर दिनांक २६ जानेवारी २०२६ रोजी शिरुर तहसिल प्रशासकीय इमारतीसमोर आत्मदहन करण्याचा टोकाचा इशारा दिला आहे. एवढ्या गंभीर स्वरूपाचा इशारा देऊनही प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया अथवा हालचाल न झाल्याने नागरिकांमध्ये तीव्र चिंता व्यक्त होत आहे.

सदर प्रकरण अत्यंत संवेदनशील असून, यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासन याबाबत तातडीने कोणती पावले उचलते, की नेहमीप्रमाणे या गंभीर तक्रारीकडे दुर्लक्ष करते, याकडे शिरुर शहरासह संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

20 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

20 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

20 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago