मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात ‘या’ गावात आढळला अज्ञात मृतदेह

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील बाभूळसर खुर्द येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. करडे-बाभुळसर अष्टविनायक महामार्गालगत डाळिंबकर मळा परिसरात एका शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एक अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

सदर मृतदेहाची ओळख अद्याप पटलेली नाही. प्राथमिक अंदाजानुसार या व्यक्तीच्या मृत्यू बाबत संशय व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार आत्महत्या आहे की हत्या याचा निर्णय अद्याप होऊ शकलेला नाही.

या घटनेची माहिती मिळताच रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक निळकंठ तिडके तसेच पोलीस हवालदार गणेश आगलावे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत पंचनामा केला. सदर मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले असुन हृदय विकाराच्या धक्क्याने सदर व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी व्यक्त केला आहे.

रांजणगाव पोलिसांकडुन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांची चौकशी करुन पुढील तपास केला जात आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Video; शिरुर तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात; भाजीपाल्याच्या घसरलेल्या दरांचा मोठा फटका

Video; शिक्रापुर येथे टेम्पो आणि अज्ञात वाहनाची जोरदार धडक; चालक फरार

Video; राजगड तालुक्यात विचित्र घटना ११ ट्रॅक्टर अडकले चिखलात

Video; शिरुर तालुक्यातील शांताई डेअरी मध्ये शेतकऱ्यांची फसवणुक होत असल्याचा आरोप

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात दुष्काळ अन् पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांकडून घेतले जातात पैसे…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर पीक नुकसानीची पाहणी करण्याचे काम सुरू…

8 तास ago

शिक्रापुर पोलिसांचा बीडमध्ये छापा; साडेचार लाखांचे दागिने हस्तगत, एक आरोपी गजाआड

शिरुर (तेजस फडके) ‘तुमच्याकडील सोन्यापेक्षा हे बिस्कीट अधिक वजनाचे आहे,’ असे भासवून महिलेचा विश्वास संपादन…

22 तास ago

सहकार वाचवण्याचे मोठे आव्हान; सत्ताधारी सहकाराचे नाही तर ‘स्वाहाकाराचे’; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…

22 तास ago

पत्रकार सन्मान योजना बंद नको; जाचक नियम हटवा, पात्र पत्रकारांना न्याय द्या!

राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…

2 दिवस ago

१८ लाख उमेदवारांच्या स्वप्नांना मिळणार आधार; ‘मिशन खाकी’चा शुभारंभ

मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…

2 दिवस ago

सामान्य कार्यकर्त्यापासून सत्ताकेंद्रापर्यंत; एकनाथ शिंदे यांच्या राजकीय प्रवासाचा वेध

संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…

2 दिवस ago