शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील टाकळी हाजी परिसरातील शांताई डेरी व पशुखाद्य येथे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणुक आणि कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ‘अन्याय तेथे प्रतिकार’ संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे आलेल्या तक्रारीनंतर संस्थेच्या संस्थापक/अध्यक्षा स्वाती गायकवाड, कार्याध्यक्षा संगिता वानखेडे, सचिव अर्चना केदारी यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली असुन संबंधित डेअरीवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
शेतकऱ्यांचे दूध घेतले पण…
‘अन्याय तेथे प्रतिकार’ संघटनेकडे आलेल्या तक्रारीनुसार, शांताई डेअरी शेतकऱ्यांकडून नियमित दूध संकलन करते. मात्र महिनोंमहिने त्याचे पैसे थकीत ठेवले जात आहेत. त्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत आले असुन, याबाबत वारंवार विचारणा करुनही डेअरी मालकाकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.
निकृष्ट पशुखाद्य विक्रीचा आरोप…
शांताई डेअरी पशुखाद्याच्या विक्रीतही मोठा भ्रष्टाचार असल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, बाजारात विकले जाणारे खाद्य हे निकृष्ट प्रतीचे असुन त्यामध्ये भेसळयुक्त व आरोग्याला घातक सामग्री वापरण्यात येते. यामुळे दुधाळ जनावरांचे आरोग्य धोक्यात आले असुन, याबाबत पशुखाद्याची त्वरित तपासणी होणे गरजेचे आहे.
विनानंबर वाहनांचा संशयास्पद वापर…
या पाहणी दरम्यान या उद्योगाच्या आवारात ५० पेक्षा अधिक विना नंबरच्या वाहनांची वर्दळ आढळुन आली. हि वाहने स्थानिक पातळीवर मालाची आयात-निर्यात करण्यासाठी वापरली जात असून, यातून RTO कायद्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे स्पष्ट होते.
संशयास्पद रासायनिक ड्रम्स…
संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी केलेल्या पाहणीत ५० ते ६० रासायनिक ड्रम्स आढळून आले असून, त्यांचा वापर कोणत्या हेतूने केला जात आहे. याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. या ड्रम्समुळे पर्यावरण आणि आरोग्यविषयक धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.
मालकाची टाळाटाळ आणि उदासीन प्रशासन…
या पाहणीदरम्यान संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जेव्हा कारखान्याचे मालक यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे या सर्व प्रकरणात आणखी गंभीर तथ्ये दडलेली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करुन संबंधितांवर फसवणूक, पर्यावरण, ग्राहक संरक्षण आणि वाहतूक कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि या गैरप्रकारांना आळा बसवावा.
स्वाती गायकवाड
अन्याय तेथे प्रतिकार संघटना
(संस्थापक/अध्यक्ष)
शिरुर पोलिसांनी ट्रान्सफॉर्मर चोरी करणार्या आंतरराज्यीय टोळीचा केला पर्दाफाश
शिरुर तपास पथकाची धडाकेबाज कारवाई मोटेवाडी येथे डाळिंब चोरी करणारा चोरटा गजाआड
शिरुर पोलिसांचा गुन्हेगारांना खरंच धाक राहिलाय का…? विनयभंग प्रकरणात पिडीतेला जिवे मारण्याची धमकी