crime
कारेगाव (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे एका व्यक्तीचा खुन झाला. याबाबत रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे मयताच्या भावाच्या तक्रारीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांचा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर सदर व्यक्तीचा मृत्यू हा डोक्यात मार लागल्याने झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रांजणगाव MIDC पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.
रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि.२७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ७ च्या सुमारास कारेगावच्या हद्दीत भाड्याने दिलेल्या खोल्यांजवळ रामप्रसाद श्रीरघुवीर सिंग (वय २९) (मुळ रा. पौडी, कुंवरपुर, ता.भरतपुर, जि.कोरीया, छत्तीसगढ) हा मयत अवस्थेत मिळुन आला होता. त्याबाबत त्याचा भाऊ रविंद्र श्रीरघुवीर सिंग याच्या खबरीवरुन रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन अकस्मात मयत दाखल करण्यात आले होते.
सदर मयताच्या डोक्यास मार लागल्याने मृत्यु झाल्याबाबत वैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन अहवाला मध्ये नमुद केल्याने पोलीसांनी मयताच्या अनुषंगाने तपासाची चक्रे फिरविली. त्यावेळी घटनास्थळावरील सी सी टि व्हि फुटेजमध्ये यातील मयत व्यक्तीस त्या ठिकाणी भाड्याने राहणाऱ्या राजेशकुमार चनिराख चौहाण (रा.बिहार) याने लाकडी दांडक्याने मारहाण केली असल्याचे दिसुन आले. त्यानंतर घडलेल्या प्रकाराबाबत मयताचा भाऊ रविंद्र सिंग याचे फिर्यादीवरुन राजेशकुमार चौहाण याच्या विरुध्द दि.२७ सप्टेंबर २०२४ रोजी तात्काळ खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरचा गुन्हा केल्यानंतर आरोपी राजेशकुमार चनिराख चौहाण (रा.बिहार) हा गुन्हा घडल्यानंतर फरार झाला होता. या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखत घटनास्थळी शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी भेट देत गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्यासाठी तीन वेगवेगळी तपास पथके तयार करुन त्यांना सुचना देवुन रवाना केले होते. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र तपास पथक असे चार तपास पथके गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेत होते.
खुनातील आरोपी हा बिहार राज्यातील असल्याने रेल्वेने मुळगावी जाण्याची शक्यता असल्याने एक तपास पथक पुणे रेल्वे स्टेशन तर दुसरे तपास पथक अहिल्यानगर येथील रेल्वे स्टेशन आणि तिसरे तापस पथक हे रांजणगाव MIDC परिसरात सी सी टि व्हि फुटेज चेक करण्यासाठी रवाना करण्यात आले होते. सदर गुन्हयातील आरोपी हा मोबाईल वापरत नसल्याने व त्याचे कोणीही नातेवाईक, मित्र कारेगाव परिसरात राहण्यास नसल्याने या आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान पोलीसांपुढे निर्माण झाले होते.
या तपास पथकाने MIDC परिसरातील सुमारे २५ ते ३० सी सी टि व्हि कॅमेरे चेक केल्यानंतर त्या आधारे रात्री १० च्या सुमारास तपास पथकास या गुन्ह्यातील आरोपी राजेशकुमार चनिराख चौहाण (वय २७) (रा.इसुआ, ता.सरमेरा, जि. नालंदा, राज्य बिहार) यास रात्री उशिरा शिताफिने ताब्यात घेत (दि २७) रोजीच अटक करण्यात आलेली आहे.
सदरची कामगीरी पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, पुण्याचे अपर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे, सहायक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण, सहायक फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलिस हवालदार विलास आंबेकर, वैज्जनाथ नागरगोजे, संतोष औटी, पोलिस कॉन्स्टेबल उमेश कुतवळ, चालक पोलिस हवालदार माऊली शिंदे, पोलिस हवालदार तेजस रासकर, गणेश आगलावे, पोलिस कॉन्स्टेबल अजित पवार यांनी तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील सहायक फौजदार तुषार पंधारे, पोलिस हवालदार जनार्धन शेळके, राजु मोमीन, संजय जाधव, पोलिस कॉन्स्टेबल सागर धुमाळ यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा पुढील अधिक तपास रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन सहायक पोलीस निरीक्षक अशोक चव्हाण हे करत आहेत.
शिरुर तालुक्यात लग्नाचे आमिष दाखवत परप्रांतीय युवकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल
शिरुर येथे पुणे-नगर महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत महिलेचा मृत्यू तर मुलगा जखमी
शिरुर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने दरोड्यातील दोन वर्षे फरार असणाऱ्या आरोपीला केली अटक
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…