शिरुर (तेजस फडके) दोन वर्षांपुर्वी कोंबड्या घेवुन जाणाऱ्या टेम्पोवर आठ जणांनी दरोडा टाकत दरोडयामधुन मिळालेल्या कोंबडयापैकी १२४० कोंबड्यांची विक्री करुन सदर विक्रीतुन आलेली रक्कम आरोपीनी वाटुन घेतली होती. तसेच हा गुन्हा घडल्यापासुन आरोपी प्रदिप उर्फ प्रदयुमन हरीश्चंद्र शिंदे (रा. करंजेनगर, शिकापुर ता. शिरुर, जि.पुणे) हा फरार होता. त्याचा शोध घेत असताना शिरुर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गुप्त माहीतीच्या आधारे शिक्रापुर परीसरातुन आरोपी प्रदीप शिंदे याला शिताफीने ताब्यात घेत अटक केली आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस रेकॉर्डवरील फरारी आरोपी प्रदिप उर्फ प्रदयुमन हरीश्चंद्र शिंदे याला शोधुन काढण्यासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मोहीम घेण्याबाबत आदेश केले होते. दोन वर्षापुर्वी शिरुर पोलिस स्टेशनला महंमद आलम अब्रार सिद्धिकी (वय ३२), व्यवसाय कोंबडया विक्री, (रा. लोकसेवा समिती, इंदिरानगर, आर एस मार्ग मालाड ईस्ट, मुंबई ९७) यांनी फिर्याद दिली होती की, त्यांच्या कोंबड्या घेवुन जाणाऱ्या टेम्पोवर आरोपी प्रदिप उर्फ प्रदयुमन हरीश्चंद्र शिंदे व त्याचे इतर ७ साथीदार यांनी दरोडा टाकुन दरोडयामधुन मिळालेल्या कोंबडयापैकी १२४० कोंबडया के जी एन बॉयलर्स शॉप नं ७, शिरढोण, पनवेल रायगड यांना विक्री करुन सदर विकीतुन आलेली ४ लाख १८ हजार ३६० रुपये या रकमेपैकी २ लाख ८८ हजार एवढी रक्कम आरोपी यांनी वाटुन घेतली होती.
सदर गुन्हा घडल्यापासुन आरोपी नामे प्रदिप उर्फ प्रदयुमन हरीश्चंद्र शिंदे हा फरार होता. त्याच अनुषंगाने शिरुर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने पोलिस स्टेशनला सदर गुन्हयातील त्याचा शोध घेत असताना त्याला शिरुर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने गुप्त माहीतीच्या आधारे शिक्रापुर परीसरातुन ताब्यात घेत अटक केली आहे. दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यात दोन वर्षे फरार असलेल्या आरोपीला शिरुर पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केल्याने पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले, शिरुरचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरुर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक हणमंतराव गिरी, पोलिस हवालदार परशुराम सांगळे, नाथसाहेब जगताप, विनोद मोरे, पोलीस अमंलदार विजय शिंदे, निरज पिसाळ, निखील रावडे, नितेश थोरात, सचिन भोई, रघुनाथ हळणोर यांच्या पथकाने केली आहे.
शिरूचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांची पहिले जनसुनवाई मगच कारवाई
बापरे! शिरूर तालुक्यात एकाच रात्रीत चोरटयांनी केली १३ विद्युतपंपांची चोरी