शिरुर (अरुणकुमार मोटे) टाकळी हाजी (ता. शिरुर) विद्युत उपकेंद्रातील सविंदणे, कवठे येमाई,निमगाव दुडे, मलठण, रा वडेवाडी, आमदाबाद या गावांतील तब्बल १५ विद्युत रोहित्रांची महीनाभरात चोरी झाली आहे.चोरट्यांनी विदयुत रोहीत्र चोरीवर चांगलाच सपाटा लावला आहे.
आज (दि १३) रोजी पहाटे रावडेवाडी येथील विद्युत रोहीत्र चोरी गेले आहे. विद्युत रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या महागड्या कॉईल्स काढून त्याची विक्री होत आहे.कमी कष्टात जास्त पैसा मिळत असल्याने चोर विद्युत रोहीत्र चोरीकडे वळाले आहे.
तसेच विद्युत रोहीत्र चोरीला जात असल्यामुळे गावचा, शेतीचा पाणीपुरवठा ठप्प होत आहे. निर्मनुष्य असणाऱ्या ठिकाणचे विद्युत रोहीत्र हेरुन ते चोरी करण्याचे काम चोर करत असल्याचे शिरुरचे विदयुत उपकार्यकारी अभियंता सुमित जाधव, टाकळी हाजी उपकेंद्राचे सहाय्यक अभियंता राजेंद्र इंगळे यांनी सांगितले आहे.
टाकळी हाजी औटपोस्टच्या वतीने रात्रगस्त घालण्याचे काम सुरू असून नागरीकांनी, ग्रामसुरक्षा दलाने सतर्क राहावे. संशयास्पद हालचाली वाटल्यास संपर्क करण्याचे आवाहन शिरूर पोलिस स्टेशनकडून करण्यात आले आहे. या विदयुत रोहित्र चोरांचा छडा लावण्याची जोरदार मागणी बेट भागातून होत आहे.
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…