मुख्य बातम्या

शिरुर येथे बजरंग दल व शिरुर पोलिसांनी १ हजार किलो गोमांस पकडले…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर -करडे रस्त्यावरील करडे घाटात एका पिकअपमध्ये गोमांस वाहतुक करताना आढळून आल्याने बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हे वाहन अडवून शिरुर पोलिसांना कळवल्याने शिरुर पोलिसांनी पिकअप सह १००० किलो गोवंश मांस जप्त करण्यात आले आहे. सदर प्रकरणी प्रतिक उर्फ नितीन रविंद्र अवचार रा. शिरूर याने शिरुर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत रितसर फिर्याद दाखल केली आहे

याबाबत सविस्तर माहिती अशी की,दि ०३ जानेवारी रोजी दुपारी ०२.०० वा चे सुमारास फिर्यादी व त्याचे मित्र गोविंद संजय देशमुख , विनायक लक्ष्मण बांदल, अजित दत्तात्रय लंघे तिघे रा. करडे, (ता. शिरुर),जि .पुणे यांचेकडे फिर्यादीचे खाजगी काम असलेने फिर्यादी तसेच फिर्यादीचा मित्र व रविद्र लक्ष्मण बैनाडे रा. शिरुर असे मिळून ते मोटार सायकल वरती शिरुर येथुन करडे गावात निघाले असता करडे घाटातुन जात असताना करडे घाटाच्या वरती एक महिद्रा कंपनीची बलेरो पिकअप गाडी थांबलेली दिसली.

सदर ठिकाणी गाडीचा चालक हा सदर बलेरो पिकअप गाडीतुन काहितरी खाली सोडत असताना दिसला. त्यावेळी फिर्यादी व त्यांच्या मित्राला असे वाटले कि तो कंपनीचे केमीकल युक्त रसायन सोडत आहे अशी शंका वाटल्याने त्यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक जाधव यांना संपर्क साधला. तेव्हा तात्काळ सदर ठिकाणी पो.उपनिरीक्षक जाधव, व पो.शि. बाबर हे दोन पंचांसह तेथे आले व त्यांनी सदर गाडी चालकास गाडीमध्ये काय आहे आम्हाला गाडीची पहाणी करायची आहे असे विचारले असता, गाडीचा चालक घाबरुन गेला. तेव्हा संशय अधिकच बळावल्याने पो.उपनिरीक्षक जाधव यांनी त्याला गाडी खोलण्यास सांगीतली.

चालकाने घाबरत घाबरत गाडीतील ताडपत्री काढली त्यावेळी सदर गाडीमध्ये मास असलेले त्यांना दिसले. तेव्हा पोलीस उपनिरिक्षक जाधव व यांनी सदर चालकास त्यांचे नाव पत्ता विचारला असता त्यांने त्यांचे नाव मोहम्मद अरिफ मुस्तफा कुरेशी (वय ३४) रा. गोंवडी प्लॉट नं १० रुम नं ५६४ मुंबई असे सांगुन सदर महिंद्रा कंपनीची बलेरो पिकअप गाडी चा नं एम एच ०४ एल ई १९५५ असे असलेबाबत सांगीतले.

सदर गाडीमध्ये असलेले मांस हे गोवंश मास असून ते बैलाचे असल्याचे चालक मोहम्मद कुरेशी यांने सांगून तो हैद्राबाद येथुन घेवुन आलो आहे. व मुंबई या ठिकाणी विक्री करण्यासाठी चालविले आहे असे सांगीतले. त्याबाबत त्याचेकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसल्याचे त्याने सांगून सदर गाडीमध्ये १००० किलो गोवंश मास असल्याचे सांगीतले. त्याप्रमाणे पोलीस उपनिरिक्षक जाधव यांनी सविस्तर पंचनामा केला आहे.

सदर गाडीतील १ लाख २० हजार रु किंमतीचे प्रती किलो १२० रू दराप्रमाणे एकुण 1 हजार किलो गोवंश मांस तसेच ५ लाख किंमतीची एक महिद्रा कंपनीची बलेरो पिकअप गाडी नं एम एच ०४ एल ई १९५५ एकुण ६ लाख २० हजार याप्रमाणे वरील वर्णनाचे व किंमतीचे गोवंश मास व वाहन सदर वाहनाचे चालकासह शिरुर पोलिसांनी पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

2 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

2 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

4 दिवस ago