न्हावरे (अक्षय टेमगिरे): उरळगाव (ता. शिरुर) येथील गट क्रं १६५ मधील दोन बोअरवेलमधून अज्ञात चोरट्याने दोन पाण्याच्या मोटारी आणि तांब्याची केबल असा सुमारे १७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात व्यक्तींनी चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी रामदास लहानू काळे (वय ७१,रा. उरळगाव, ता. शिरुर) यांनी शिरुर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळे यांच्या शेतातील बोअरमधील लक्ष्मी कंपनीची ५ एचपी क्षमतेची मोटार व २५० फूट तांब्याची तार असलेली केबल, तसेच त्यांचे बंधू बाळासाहेब काळे यांच्या शेतातील बोअरमधील लक्ष्मी कंपनीची ३ एचपी क्षमतेची मोटार व २५० फूट तांब्याची तार असलेली केबल अज्ञात चोरट्याने लंपास केली.
हि चोरी १२ ऑगस्ट ते १३ ऑगस्ट च्या दरम्याच्या कालावधीत घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. शेतातील बोअरवेलवर लावलेल्या मोटारी व केबल गायब असल्याचे लक्षात आल्यानंतर काळे यांनी याबाबत पोलिसांकडे धाव घेतली. चोरीस गेलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत १७ हजार रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
याप्रकरणी १४ ऑगस्ट २०२६ रोजी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत. शेतातील बोअरवेलवरील मोटारी, केबल तसेच शेती साहित्याच्या चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील हालचालींची माहिती घेतली जात असून, अज्ञात चोरट्याचा शोध सुरु आहे.
शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्यावर दुष्काळाचे ढग दाटले आहेत. खरीप हंगामाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला…
शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर…
मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…
ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…
मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…