Shirur Police Station
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी पोलिस हवालदारांनी लाच मागितल्याच्या दोन स्वतंत्र प्रकरणांवर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केली आहे. एका प्रकरणात पोलिस हवालदाराला ११ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले, तर दुसऱ्या प्रकरणातील पोलिस हवालदाराने ९५ हजार रुपयांची लाच स्वीकारल्यानंतर एसीबी पथकाची चाहूल लागताच अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले.
एसीबीच्या १ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सतीश नाथाराव मुंढे (वय ४५), पोलिस हवालदार, शिरूर पोलिस ठाणे यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात बीएनएसच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल असून, त्याचा तपास हवालदार सतीश मुंढे यांच्याकडे होता. या गुन्ह्यात तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांना अटक न करण्यासाठी तसेच तपासात मदत करण्याच्या मोबदल्यात मुंढे यांनी सुरुवातीला एक लाख रुपयांची लाच मागितल्याचे एसीबीच्या पडताळणीत निष्पन्न झाले. तडजोडीनंतर ही रक्कम ९५ हजार रुपये ठरली. त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी टाकळी हाजी पोलिस चौकी येथे सापळा रचण्यात आला. पंचांसमक्ष सतीश मुंढे यांनी तक्रारदाराकडून ९५ हजार रुपये स्वीकारले. मात्र, एसीबी पथकाची चाहूल लागताच मुंढे यांनी स्वीकारलेली लाचेची रक्कम घेऊन अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले. त्यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७ तसेच बीएनएस कलम २३८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याचदरम्यान, शिवाजी ज्योतीराम बनकर (वय ४४), पोलिस हवालदार, शिरूर पोलिस ठाणे यांच्यावरही एसीबीने कारवाई केली. तक्रारदार व त्यांच्या आई-वडिलांना दाखल गुन्ह्यात अटक न करता नोटीस देऊन सोडण्यासाठी तसेच गुन्ह्यात मदत करण्याच्या मोबदल्यात बनकर यांनी सुरुवातीला १५ हजार रुपयांची लाच मागितल्याचे एसीबीच्या पडताळणीत निष्पन्न झाले. तक्रारदाराने यापूर्वीच ५ हजार रुपये दिले होते. त्यानंतर उर्वरित रकमेपैकी ४ हजार रुपये स्वीकारल्याचे मान्य करून बनकर यांनी आणखी ११ हजार रुपयांची मागणी केल्याचे एसीबीने नमूद केले आहे.
३० सप्टेंबर रोजी जुन्या शिरूर पोलिस ठाणे परिसरात सापळा रचण्यात आला. पोलिस स्टेशनबाहेरील रस्त्याच्या कडेला तक्रारदाराकडून ११ हजार रुपये स्वीकारताना शिवाजी बनकर यांना एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले. त्यांना त्याच दिवशी रात्री ९.३३ वाजता ताब्यात घेण्यात आल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.
दोन्ही कारवाया पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या. सतीश मुंढे प्रकरणात पोलिस निरीक्षक शैलजा शिंदे यांनी सापळा अधिकारी म्हणून, तर शिवाजी बनकर प्रकरणात पोलिस निरीक्षक आसावरी शेडगे यांनी सापळा अधिकारी म्हणून काम पाहिले. प्रकरणांचा पुढील तपास एसीबीकडून सुरू आहे.
दरम्यान, शिरूर पोलिस ठाण्याअंतर्गत टाकळी हाजी चेथील एकाच कालावधीत दोन पोलिस हवालदारांवर झालेल्या या स्वतंत्र एसीबी कारवायांमुळे पोलिस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणांमध्ये मुंडे हवालदाराने वरिष्ठांचेही नाव घेतल्याची चर्चा जोरदार रंगली असून यामध्ये आणखीन कोण कोण सामील आहे याचा तपास लाल लुचपत विभाग करत आहे. (क्रमशः)
पुणे जिल्ह्यात लाच घेताना उपविभागीय अधिकारी रंगेहात सापडला…
रामदास जगताप यांना लाच घेतला रंगेहात पकडले अन् झाली अटक…
भाजप आमदार चंद्रू लमाणी लाच प्रकरणात अटकेत; 5 लाख स्वीकारताना रंगेहात पकडले
शिरूर (तेजस फडके) : शांत, शेतीप्रधान तालुका म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्याची ओळख आता गुन्हेगारीच्या…
मलठण (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील मलठण-कवठेयमाई अष्टविनायक मार्गावरील मुंजाळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ भरधाव…
ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…
मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…
शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…
मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…