मुख्य बातम्या

दादा स्वगृही परत या; आम्हाला तुमची गरज…आढळराव पाटील यांना शिंदे गटातील शिवसैनिकांचा आग्रह

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभा मतदार संघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडुन तिकीट घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या आणि तीनवेळा खासदार राहिलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्याकडुन पराभव स्वीकारावा लागला. परंतु पराभवाने खचुन न जाता आढळराव यांनी पुन्हा कंबर कसली असुन नुकतीच म्हाडाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली असुन आढळराव पाटील यांनी परत शिवसेना (शिंदे गट) पक्षात यावे अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी आज (दि २८) रोजी लांडेवाडी येथे केली.

 

लोकसभा निवडणुकीत महायुतीची शिरुरची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटल्याने शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहमतीने राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. परंतु लोकसभा निवडणुकीत सर्वसामान्य मतदारांना त्यांची हि भुमिका रुचली नाही. त्यामुळे मतदारांनी आढळराव यांना नाकारले आणि कोल्हे यांना निवडुन दिले. परंतु आढळराव यांनी पुन्हा शिवसेना (शिंदे गट) पक्षात यावे अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली असुन आढळराव हे पुन्हा शिवसेनेत आल्यास पुणे जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकत वाढेल असे मत सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केले.

 

यावेळी शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख इरफान सय्यद, जिल्हाप्रमुख भगवान पोखरकर, युवासेना जिल्हाप्रमुख बापुसाहेब शिंदे, शिरुर-आंबेगाव तालुकाप्रमुख मल्हारी काळे, शिरुरचे तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, हवेलीचे तालुकाप्रमुख विपुल शितोळे, खेडचे तालुकाप्रमुख राजेंद्र जवळकर, जिल्हा परिषदचे गटनेते देविदास दरेकर, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन, शिवसेना जिल्हा उपप्रमुख अनिल काशिद, शरद नवले, शिरुर युवासेना प्रमुख विष्णु वाळके, तालुका संघटक दत्ता गिलबिले, युवा कार्यकर्ते वैभव ढोकले, आण्णा हजारे आदी कार्यकर्त्यांनी हि आग्रही मागणी केली आहे.

शिरुर तालुका म्हणजे महसूल, पोलिस, MIDC तील कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी भ्रष्टाचाराचे कुरण…?

शिरुर तालुका भुमिअभिलेख तर्फे गावनिहाय शासकिय सनद वाटप होणार; उपअधीक्षक अमोल भोसले

शिरुर तालुक्यात विभागीय कृषी सहसंचालक यांचे बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

20 तास ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

22 तास ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

1 दिवस ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

1 दिवस ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

2 दिवस ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

2 दिवस ago