आरोग्य

पावसाळ्यात रोज १ चमचा मध खा; पाहा ५ फायदे…

पावसाळा आला की, आजारांचा धोका वाढतो. या ऋतूत आपली रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्याने आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. पावसाळ्यात बदलत्या वातावरणामुळे ताप, सर्दी, डोकेदुखी, सांधेदुखी आणि पचना संबंधित आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात. पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे गरजेचे असते. पावसाळ्यात आपल्या आहारात काही बदल करून आपण रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करुन निरोगी राहू शकतो. यासाठी आपण आपल्या आहारात मधाचा समावेश करू शकतो. मध हा एक असा पदार्थ आहे जो आपल्याला अनेक प्रकारे फायदा करू शकतो…

मधामध्ये अनेक प्रकारचे पोषक तत्वे असतात जे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात. पावसाळ्यात मध खाल्ल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि अनेक आजारांपासून आपले रक्षण होते. मध हा नैसर्गिक अँटीऑक्सिडंट, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल एजंट आहे. यामुळे पावसाळ्यात होणाऱ्या सर्दी, खोकला, पचन विकार आणि इतर अनेक आजारांपासून आपले रक्षण होते. पावसाळ्यात मध खाल्ल्याने नेमके कोणते फायदे होतात ते जाणून घेऊया. आयुर्वेदिक डॉक्टर दीक्षा भावसार यांनी पावसाळ्यात मध खाण्याचे नेमके फायदे काय आहेत आणि मध कसे खावे याची योग्य पद्धत सांगितली आहे

पावसाळ्यात रोज १ चमचा मध खाण्याचे फायदे…
१. पावसाळ्यात दररोज १ टेबलस्पून मध खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि अनेक आजारांपासून बचाव होतो.
२. मध खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि फ्लूपासून बचाव करण्यास देखील मदत होते.
३. मधामध्ये प्रोबायोटिक गुणधर्म असतात. रोज १ चमचा मध खाल्ल्याने पावसाळ्यात पचनाच्या समस्यांपासून आराम मिळतो.
४. वजन कमी करायचे असले तरी रोज १ चमचा मध खाणे फायदेशीर ठरते.
५. मधामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. हे पावसाळी सर्दी, खोकला यांसारख्या आजारांना दूर करण्यास मदत करते.
६. रोज १ चमचा मध खाल्ल्याने शरीरातील अशक्तपणा दूर होतो आणि शरीराला शक्ती मिळते.

मध खाण्याची योग्य पद्धत…
१. पावसाळ्यात तुम्ही तुमच्या आहारात मधाचा अनेक प्रकारे समावेश करू शकता.
२. वजन कमी करण्यासाठी १ टेबलस्पून मध पाण्यात मिसळून हे पाणी प्यावे.
३. खोकला दूर करण्यासाठी रात्री १ टेबलस्पून मध काळी मिरी पूड सोबत खावे.
४. पावसाळ्यात सुंठ पावडर १ टेबलस्पून मधात मिसळून खाल्यानेही फायदा होतो.
५. तज्ज्ञ सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री झोपण्यापूर्वी मध खाण्याचा सल्ला देतात.

(डॉक्टरचां नेहमी सल्ला घ्या.)

पावसाळ्यात दुधाचा चहा प्यायल्याने काय होतं नुकसान? घ्या जाणून…

वजन कमी करण्यासाठी लिंबू पाणी पिता का? यात किती तथ्य घ्या जाणून…

घरातील झुरळ कसे बाहेर काढाल? सोपे उपाय पाहा…

दिवसभरात किती कप कॉफी पिणं योग्य? घ्या जाणून…

मिक्स्ड फ्रूट ज्यूस पिताय तर जरा थांबा; शरिरासाठी ठरू शकते घातक…

कोमट पाणी प्यायल्याने खरंच वजन कमी होतं का?; घ्या जाणून…

डेंग्यू झाल्यावर रूग्णानी काळजी कशी घ्यावी? घ्या जाणून…

मूग डाळीचं पाणी पिण्याचे फायदे

साखरेपेक्षा खडीसाखरेला आहे जास्त महत्व, पहा फायदे 

पीत्त होण्याची कारणे आणि उपाय…

बडिशेप हे पचनसंस्थेसाठी उत्तम औषध

कोथिंबीर, कांदा, लसूण यांचे आरोग्यासाठी मोठे फायदे 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

डीजेचा दणदणाट ठरला जीवघेणा! सांगवीत लोखंडी कमान कोसळून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

पिंपरी-चिंचवड : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात गणेशोत्सवातील डीजेवरून जोरदार चर्चा सुरू असतानाच, जुन्या सांगवी परिसरातून…

8 तास ago

रक्ताचे नातेवाईक कुणीच पुढे आले नाहीत; ग्रामपंचायतीने स्वीकारली अंत्यविधीची जबाबदारी

आंबेगाव : आयुष्याची तब्बल ८० वर्षे धार्मिक संप्रदायात व्यतीत केलेल्या रामदास खंडुजी शिंदे यांच्या निधनानंतर…

8 तास ago

सोलापुरात अघोषित भारनियमनावर पालकमंत्री संतापले; स्वाभिमानीचा पलटवार

सोलापूर : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असतानाच कृषीपंपांचा वीजपुरवठा अचानक…

8 तास ago

‘महाराष्ट्राची वाघीण’ अश्विनी पौळ यांचा दुर्दैवी अंत; तीन मुलांसह नळदुर्ग किल्ल्यावरून उडी

धाराशिव : राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि ‘महाराष्ट्राची वाघीण’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला कुस्तीपटू…

8 तास ago

कायद्याची लाठी सर्वांसाठी समान आहे का? संतोष पंडित यांच्या अटकेने महाराष्ट्रासमोर मोठा सवाल!

लोकशाहीमध्ये प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य हा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि कायदा सर्वांसाठी…

9 तास ago

शिक्षक हे भविष्याचे खरे शिल्पकार; गुणवत्तापूर्ण शिक्षणातून सक्षम समाजाची उभारणी; सुनेत्रा पवार

पुणे: शिक्षक हे आपल्या भविष्याचे खरे शिल्पकार आहेत. त्यांच्या समर्पित कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला…

9 तास ago