शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील अनेक गावांच्या गावठाणांची सविस्तर मोजणी, चौकशी, सनद व मिळकत पत्रिका तयार करण्याचे काम पुर्ण झाले आहे. भुमि अभिलेख तर्फे सोमवार व मंगळवार दि २९ जुलै २०२४ व ३० जुलै २०२४ रोजी सनद त्या त्या गावातील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये वाटप करण्यात येणार असल्याची माहीती शिरुर भुमि अभिलेख उपअधीक्षक अमोल भोसले यांनी दिली आहे.
याबाबत त्यांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शिरुर तालुक्यातील अनेक गावांच्या गावठाणांची सविस्तर मोजणी, चौकशी, सनद व मिळकत पत्रिका तयार करण्याचे काम पुर्ण झाले आहे. या सनदीचे वाटप सोमवार व मंगळवार दि.२९ जुलै २०२४ व ३० जुलै २०२४ रोजी होणार आहे. तरी सनद धारकांनी आपली सनद फी भरून सनद प्राप्त करुन घ्यावी. शिरुर तालुक्यातील अनेक गावांमध्ये गावठाणाची मोजणी होवुन मिळकत पत्रिका आणि सनद तयार करण्यात आली आहे.
सनद शासकीय दस्ताऐवज आहे. सनद हा शासकीय व कायदेशीर पुरावा आहे. गावठाणातील प्रत्येक मिळकतीचा नकाशा हा सनद आणि मिळकत पत्रिकेवरून होणार आहे. सनदीमुळे गावठाणात घराच्या बांधकामासाठी नकाशा उपलब्ध होणार आहे. यामुळे ग्रामस्थ आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे.
सनदीमुळे मिळणारे फायदे…
सनदीमुळे खरेदी व विक्री सुलभ होऊन फसवणुक टळणार आहे. संबधितांना सनदीच्या स्वरुपाने मालकी हक्काचा पुरावा मिळणार असल्याने वाद व तंटे उद्भवणार नाहीत. सनदीमुळे बँकांकडून सहजरित्या कर्ज उपलब्ध होणार आहे. पुणे जिल्हयाचे जिल्हा अधिक्षक सूर्यकांत मोरे आणि पुणे विभागाचे उपसंचालक अनिल माने यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार शिरूर तालुक्यातील नागरिकांना लवकर व सुलभरीत्या सनद वाटप करण्यात येणार आहे.
शिरुर तालुक्यात आरणगाव, चांडोह, निमगांव दुडे व वडनेर खुर्द या गावांमध्ये सोमवार व मंगळवार रोजी सनद वाटप करण्यात येणार आहे. प्रत्येक गावात अधिकाऱ्यांमार्फत सनद धारकांना ही सनद देण्यात येणार आहे. तरी सनद धारकांनी उपस्थित रहावे. सनद धारकांनी आपली सनद प्राप्त करून घ्यावी असे आवाहन भूमि अभिलेखच्या उपअधीक्षक अमोल भोसले यांनी केले आहे.
शिरुर तालुक्यात विभागीय कृषी सहसंचालक यांचे बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन
शिरुर तालुका म्हणजे महसूल, पोलिस, MIDC तील कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासाठी भ्रष्टाचाराचे कुरण…?
शिरुर तालुक्यातील सर्व प्रवर्ग दिव्यांगासाठी महाराजस्व अभियान राबवणार; बाळासाहेब म्हस्के