मुख्य बातम्या

रांजणगावची कन्या आणि शिक्रापूरच्या सासवडेंची सून बनली पोलीस उपअधीक्षक

शिक्रापूर ग्रामस्थ व सासवडे कुटुंबीयांनी काढली पुजाची मिरवणूक

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पूजा प्रथमेश सासवडे हिची यापूर्वी २०२१ महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या परीक्षेतून मंत्रालय कक्ष अधिकारी बनून देखील नंतर जिद्द कायम ठेवत आय पोलीस उपअधीक्षक पदाला गवसणी घातली असल्याने पूजा मुळे शिक्रापूरच्या सासवडे सह रांजणगावच्या पवार घराण्याचे नाव उज्वल झाले आहे.

पूजाचा जन्म रांजणगाव येथील पवार कुटुंबियात झाला. वडील विठ्ठल पवार यांनी शेती सांभाळून आपल्या मुलांना शिक्षक दिले, शिक्षणात पूजा हुशार मात्र अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न होते, शिक्षणानंतर तिने स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु ठेवली. दीड वर्षापूर्वी तिचा विवाह शिक्रापूर येथील माजी सैनिक असलेली जालिंदर सासवडे यांचा मुलगा प्रथमेश सोबत झाला. मात्र लग्नानंतर पतीसह सासरच्या मंडळींकडून तिला शिक्षणाला साथ मिळाली.

पुजाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा देत यापूर्वी मंत्रालय कक्ष अधिकारी पदाला गवसणी घातलेली असताना पुन्हा तयारी करत परीक्षा देऊन आता नव्याने पोलीस उपअधीक्षक पदावर मजल मारली आहे. पूजाच्या यशाबद्दल शिक्रापूर सह रांजणगाव चे नाव उज्वल झाले असल्याने नुकतीच शिक्रापूर गावातून पुजाची वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी पूजाच्या आई वडिलांसह सासू, सासरे तसेच पती यांचा ग्रामस्थांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शिक्रापूर सह रांजणगाव गणपतीचे ग्रामस्थ व आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माझे लहानपणापासून अधिकारी होण्याचे स्वप्न होते. त्यामुळे मी शिक्षणा नंतर स्पर्धा परीक्षेच्या तयारीवर भर दिली. प्रथम मंत्रालय कक्ष अधिकारी झाले आता पोलीस उपअधीक्षक झाले असून मला माझ्या आई वडिलांसह पती व सासू सासऱ्यांची मोठी साथ मिळाली यापुढे पदाच्या माध्यमातून जनतेची सेवा करणार असल्याचे पूजा पवार- सासवडे यांनी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कारेगाव हत्याकांड; गोळीबार करणाऱ्या भैय्या जाधवला बेड्या; पवन हुंडारे अद्याप फरार

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…

11 तास ago

शिरुर तहसील कार्यालयाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह…? अ‍ॅड सुमित पोटे यांची प्रांताकडे तक्रार

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…

17 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त, सरकारची मदत मात्र तुटपुंजी!

पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…

17 तास ago

शेतकऱ्यांचे हित हेच माळेगाव कारखान्याचे ध्येय! अजितदादांच्या मार्गावरूनच वाटचाल करणार; सुनेत्रा पवार

माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…

18 तास ago

शेतकऱ्यांना ५ हजारांची मदत म्हणजे क्रूर थट्टा; प्रति एकर २५ हजार रुपये द्या; ॲड. अमोल मातेले

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…

18 तास ago

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा; वसूल केलेली रक्कम परत द्या; चंद्रकांत पाटील

पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…

18 तास ago