balrangbhumi-2026
बालरंगभूमी परिषदेतर्फे ‘कै. सौ.मनीषाताई भाऊसाहेब भोईर स्मृती नाट्यछटा स्पर्धा’ 2026 उत्साहात संपन्न
शिक्रापूर: बालरंगभूमी परिषद, पुणे जिल्हा शाखा आणि पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने आयोजित कै. सौ. मनिषा भाऊसाहेब भोईर स्मृती नाट्यछटा स्पर्धा 2026 ही स्पर्धा रविवार, दि. 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9 वाजता युरो कॅम्पस, शिक्रापूर येथे मोठ्या उत्साहात पार पडली.
बालकलाकारांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे, त्यांच्यामध्ये अभिनयाची आवड निर्माण व्हावी तसेच बालरंगभूमीची समृद्ध परंपरा पुढे न्यावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध शाळा व संस्थांमधून सहभागी झालेल्या बालकलाकारांनी आपल्या अभिनय कौशल्याचे प्रभावी सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. श्रीधर तानाजी धुमाळ साहेब (जॉइंट कमिशनर, कस्टम्स) होते. अनुश्री धुमाळ डायरेक्टर युरो कँपस, देवीप्रसाद सोहोनी (अभिनेते, लेखक, दिग्दर्शक) यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे परीक्षण अरुण पटवर्धन, मनोज डाळिंबकर, पंकज चव्हाण, प्रेम सूर्यवंशी, प्रीती केसरकर, मंजुषा जोशी, मयुरी भोंडे, स्वप्निल खंबायत आणि संतोष रासने यांनी केले.
स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी भाऊसाहेब भोईर, उपाध्यक्ष – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मध्यवर्ती मुंबई तसेच चित्रपट निर्माते होते. प्रमुख पाहुणे म्हणून सूर्यकांतकाका पलांडे (माजी आमदार) आणि मुकेश सोनी ( गिरित्र ज्वेलर्स) उपस्थित होते. या स्पर्धेसाठी युरो कॅम्पस, शिक्रापूर यांचे विशेष सहकार्य लाभले, तर गिरीत्र ज्वेलर्स यांचे सौजन्य लाभले.
बालकलाकारांनी सादर केलेल्या विविध नाट्यछटांमधून अभिनय, संवादफेक, भावभावना, रंगमंचावरील आत्मविश्वास आणि सर्जनशीलतेचे दर्शन घडले. स्पर्धेच्या माध्यमातून बालकलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळाल्याने पालक, शिक्षक आणि रसिक प्रेक्षकांनी आयोजकांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालरंग भूमी परिषद पुणे जिल्हा शाखेच्या अध्यक्ष दिपाली शेळके यांनी केले. या प्रास्ताविकामध्ये परिषदेचे ववर्षभर होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. श्रीधर धुमाळ जॉईंट कमिशनर कस्टम यांनी युरो कॅम्पसचे कार्य उद्देश पालकांना आणि विद्यार्थ्यांना सांगून भविष्यात यशस्वी व्हायचे असेल तर संस्कारक्षम ,तत्त्वनिष्ठ राहून उपासना करून यशस्वी होता येते हे सांगितले. युरो कॅम्पसच्या डायरेक्टर अनुश्री धुमाळ यांनी सर्व शाळांचे पालकांचे आणि सहभागी स्पर्धकांचे विजेता स्पर्धकांचे कौतुक केले.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबईचे उपाध्यक्ष आणि चित्रपट निर्माते भाऊसाहेब भोईर यांनी आपल्या मनोगत सांगितले की , नाट्यशास्त्राचे महत्व विशद करून मुलांना यामध्ये करिअर करता येऊ शकते त्यासाठी मुलांच्या मध्ये जिद्द आणि मेहनत करण्याची ताकद हवी तसेच मोबाईल पासून दूर राहा असे सांगितले.
माजी आमदार सूर्यकांत पलांडे यांनी विद्यार्थ्यांना खूप अभ्यास करा मोठे व्हा यशस्वी व्हा अशा शुभेच्छा दिल्या. मुलांच्या बक्षिसांचे प्रायोजक झालेल्या गिरित्र ज्वेलर्सचे मुकेश सोनी यांनीही विजेत्या विद्यार्थ्यांचा अभिनंदन केले. स्पर्धेच्या दरम्यान उपस्थितअसणाऱ्या पालकांसाठी आणि शिक्षकांच्या साठी आगळ्या वेगळ्या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले हा प्रशिक्षण वर्ग देवीप्रसाद सोहोनी लेखक अभिनेते आणि दिग्दर्शक यांनी घेतला.
बालरंगभूमी परिषदेचे सहसचिव विजय तांबे, संजय तांबे युरो कॅम्पस चे सेंटर हेड मयूर मोडसिंग आणि राजनंदिनी धुमाळ उपस्थित होते. सूत्रसंचालन विजया धुमाळ, गणेश बांगर यांनी केले. आभार बालरंगभूमी परिषदेचे उपाध्यक्ष नारायण करपे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी बालरंगभूमी परिषद, पुणे जिल्हा शाखा व पिंपरी चिंचवड शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, परीक्षक, शिक्षक, पालक आणि सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
गट क्रमांक 1. (पहिली, दुसरी)
अंतिम निकाल
1. दिविशा गुगळे
2. गौरी कुंमरे
3. विहा चव्हाण 4. अन्वी कलंत्री
5.ओवी जाधव
6.प्रवाया भरडे
गट क्रमांक – २ ( इयत्ता ३री ते ४थी)
1. वैष्णवी रामचंद्र सरगर
2. मृण्मयी साकोरे
3. इनाया आरिफ शेख
4. आराध्या प्रमोद पाठक
5. अन्वी बाबू गवळी
6. तेजस्विनी गायकवाड
7. संस्कृती मांडवगडे
8. देविका कुमार
9. सिद्धेश चौधरी
10. श्रीपाद नाळे
11. प्रत्युषा राठोड
गट क्रमांक – 3
1. निधी हेमराज साळुंखे
2. सीया पाटील
3. गौरी मनोज धरमे
4. स्वप्निल जाधव
5. श्रावणी गणेश चौधरी
6. राजविका धुमाळ
7 साईराज क्षीरसागर
8 आराध्या अदक
9. स्वरा चंदनगिरे
10. वेदिका हांडे
11. साजिद शेख
12. मयूर कीर्तने
13. सृष्टी प्रवीण बागुल
14. श्रेयस तुकाराम गर्जे
15. स्वराज गंगाधर दहिफळे
16. ओमराज कान्हुरकर
17. सायली संतोष काळे
18. अश्विनी बाबासाहेब कांबळे
19. भार्गवी अजित बोरुडे
20. मैथली परदेशी
21. ओवी कलंत्री
22. ऋग्वेद पाठारे
गट क्रमांक – ४ ( इयत्ता ८,९, व १० वी)
१. भूमी राजकुमार सूर्यवंशी
2. समृद्धी सातपुते
3. उमंग मनोज दुसाने
4. श्रेया संभाजी सानप
5. सायली रमेश पवार
6. टुंबरे हर्षाली सखाराम
7. वैष्णवी सुरेश उमाप
8. साक्षी उद्धव सातपुते
9. पायल बापूसो पवार
10. इशिका ईश्वर डोमाळे
1) श्री संभाजी राजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय जातेगाव बुद्रुक
प्रथम क्रमांक(100)
2) श्री वसंतराव डावखरे मेमोरियल स्कूल, जगताप पिंपळे (54)
द्वितीय क्रमांक
3) ज्ञानवर्धिनी विद्या मंदिर , तळेगाव ढमढेरे (41)
तृतीय क्रमांक
4) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोयाळी पुनर्वसन
द्वितीय क्रमांक (38)
उत्तेजनार्थ
5) श्री पद्ममणी जैन इंग्लिश मीडियम स्कूल पाबळ
द्वितीय क्रमांक (36)
उत्तेजनार्थ
6) जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल सणसवाडी
उत्तेजनार्थ (29)
7) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बांगर वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे
8) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुखई
9) व्हिजन इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज अँड सायन्स शिरूर
10) तात्यासाहेब खंडेराव सोनवणे विद्यालय निर्वी
11) विठ्ठलराव सातव इंग्लिश मीडियम स्कूल वाघोली
12) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्रापूर
13) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोरेगाव भीमा
14) श्री जोगेश्वरी विद्यालय केसनंद
15) आर्यन धारिवाल इंग्लिश मीडियम स्कूल शिरूर
16) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोंडेकर मळा
17 ) स्वा. से. कै. शंकरराव बाजीराव डावखरे विद्यालय पिंपळे खालसा हिवरे कुंभार तालुका शिरूर जिल्हा पुणे
18) विद्या विकास मंदिर निमगाव महाळुंगी
19) अभिनव विद्यालय सरदवाडी
20) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जातेगाव खुर्द
21) युरो किड्स, शिक्रापूर
22) श्रीमती बबई ताई टाकळकर माध्यमिक आश्रम शाळा निमगाव म्हाळुंगी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे
खाजगी व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे महसूल प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह...? शिरूर (तेजस फडके): शासकीय कार्यालय म्हणजे जनतेच्या कामासाठी…
मुंबई : पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेत मुलाखतीशिवाय निवड प्रकारातील १३ हजार ११९…
मुंबई : “मराठीवर सक्ती करणारी नव्हे, तर मराठीवर भक्ती करणारी गर्दी आज येथे पाहायला मिळत…
पुणे : बहिण-भावाच्या पवित्र नात्याचा सण असलेल्या रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी पुण्यातील वाकड परिसरात ३२ वर्षीय…
नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन अनिश्चित काळासाठी स्थगित होऊन १४ दिवस उलटले असतानाही अधिवेशनाच्या…
कोडरमा : भाजपचे ज्येष्ठ नेते बालगोविंद प्रसाद यादव यांचे मंगळवारी पोखरवाडी येथील पैतृक निवासस्थानी दुःखद…