शिरूर तालुका

शिरूर तहसिल कार्यालयाच्या गौण खनिज विभागाची ‘खुर्ची’ संध्याकाळी सहा नंतर खाजगी एजंटांच्या ताब्यात…?

खाजगी व्यक्तींच्या हस्तक्षेपामुळे महसूल प्रशासनाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह…?
शिरूर (तेजस फडके): शासकीय कार्यालय म्हणजे जनतेच्या कामासाठी उभारलेली व्यवस्था. येथे प्रत्येक टेबल, प्रत्येक खुर्ची आणि प्रत्येक फाईलला शासनाची जबाबदारी जोडलेली असते. मात्र, शिरुर तहसील कार्यालयातील गौण खनिज विभागाच्या कामकाजाबाबत समोर येणाऱ्या तक्रारींमुळे ‘या विभागाचा कारभार नेमका अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या हातात आहे की खाजगी एजंटांच्या…?’ असा थेट सवाल उपस्थित झाला आहे.

गौण खनिज विभाग हा महसूल प्रशासनातील अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील विभाग आहे. मुरुम, वाळू, दगड, खडी, माती यांसह विविध गौण खनिजांचे उत्खनन, वाहतूक, परवाने, रॉयल्टी, दंडात्मक कारवाई आणि अनधिकृत उत्खननावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी या विभागावर आहे. अशा विभागात नियम, नोंदी आणि अधिकृत यंत्रणा यांना सर्वोच्च प्राधान्य असणे अपेक्षित आहे. मात्र, या विभागातील कामकाजाबाबत खाजगी व्यक्ती अथवा एजंटांचा हस्तक्षेप होत असल्याच्या तक्रारी काही सजग नागरिकांकडून पुढे येत असुन प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

सरकारी टेबलवर ‘खासगी’ कारभार…?
सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शासकीय कार्यालयातील अधिकृत खुर्चीवर बसून काम करण्याचा अधिकार नेमका कोणाला आहे…? एखाद्या खाजगी व्यक्तीला शासकीय पद नसताना कार्यालयीन कामकाजाशी संबंधित कागदपत्रे तसेच संगणक हाताळण्याची परवानगी आहे का…? बाहेरील व्यक्ती किंवा एजंट कार्यालयीन कामकाजात इतका हस्तक्षेप कसा काय करु शकतो. गौण खनिज विभागातील कर्मचाऱ्याच्या टेबलवर बसुन जर तो कामकाज पाहत असेल तर तिथं सरकारी बाबु नक्की कुणासाठी काम करतात. सर्वसामान्य जनतेसाठी की एजंटांसाठी हा प्रश्न उपस्थित होत असुन हा प्रश्न केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित नसून संपूर्ण महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर संशयाची सुई निर्माण करणारा आहे.

गौण खनिज विभाग नक्की कोणासाठी काम करतय सर्वसामान्य जनतेसाठी की खाजगी एजंटांसाठी…?
या प्रकरणाची सत्यता पडताळण्यासाठी कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज, अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती, गौण खनिज विभागातील फाईली, अर्जांची नोंद, परवान्यांची प्रक्रिया आणि संबंधित अधिकृत आदेश यांची तपासणी केल्यास वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते. खाजगी व्यक्ती कार्यालयीन कामकाजात सहभागी असल्याचे आढळल्यास त्याला कोणत्या अधिकाराने प्रवेश किंवा जबाबदारी देण्यात आली, याची चौकशी होणे आवश्यक आहे. आणि गौण खनिज विभागाची खुर्ची अधिकृत कर्मचाऱ्यांसाठी आहे की खाजगी एजंटांसाठी…? यावर तहसील कार्यालयातील गौण खनिज विभागाबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाने द्यायला हवीत.

जिल्हाधिकारी लक्ष देणार का…?
शिरुर तहसील कार्यालयात संध्याकाळी सहा वाजल्यानंतर गौण खनिज विभागात खाजगी एजंट खुर्चीवर बसुन संगणकावर काम करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या गंभीर प्रकाराची जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि संबंधित वरिष्ठ महसूल अधिकारी दखल घेऊन स्वतंत्र चौकशी करणार का…? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. शिरुर तहसिलदार कार्यालयात जर खाजगी एजंट सरकारी कर्मचाऱ्याच्या जागेवर बसुन संगणकावर कामकाज करत असेल तर त्या संबंधित कर्मचाऱ्यावर वरिष्ठ अधिकारी कारवाई करणार का…? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कारण हा प्रश्न एका खुर्चीचा नाही; प्रश्न आहे तो शासकीय यंत्रणेवरील जनतेच्या विश्वासाचा.
(क्रमश:)

शिरुर तालुक्यातील एका शासकीय पाझर तलावाला लागली भुक…हजारो ब्रास गौण खनिज केले गिळंकृत…

शिरुर महसुल विभागाची गौण खनिज उपसा करणाऱ्या ४ पोकलेन व १४ ट्रकवर कारवाई

वाळू तस्करांना दंड नाही तर थेट ‘एफआयआर’; महसूल विभागाचे नवे परिपत्रक

शिरूर तहसील कार्यालयाच्या पार्किंग मध्ये ‘महाराष्ट्र शासन’ पाटी लावून एका अधिकाऱ्याची खासगी गाडी आली थाटात अन…

शिरूर तालुक्यात मंडल अधिकाऱ्याचा अजब कारभार; सुनावणीच्या तारखेच्या आधीच निकाल…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर तालुक्यात ठेवीदारांच्या पैशांवर डल्ला; पोस्टाच्या १५ लाख ४४ हजार रुपयांच्या अपहाराने खळबळ

शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिक आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून थोडी थोडी रक्कम साठवून ती सुरक्षित राहावी…

4 तास ago

वय वाढल्यामुळे तुमच्या पोटावर आणि त्याच्या कार्यांवर होतो असा परिणाम

आपल्या वयानुसार शरीरात विविध शारीरिक बदल होतात आणि पचनसंस्थेचाही त्यात समावेश आहे. हे बदल पचनक्रियेवर…

1 दिवस ago

हृदयासाठीही फायदेशीर आहे आवळ्याचं ज्यूस!

आयुर्वेदात आवळा हे काही उत्तम फळांपैकी एक फळ मानले जाते. आवळ्याचे जूस पिल्याने आरोग्याशी संबंधित…

1 दिवस ago

बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; एकनाथ शिंदेंचा निर्धार

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नवरात्र मंडळांनी पुढाकार घ्यावा; टेंभी नाक्याच्या देवीसमोर शेतकऱ्यांसाठी साकडे ठाणे: महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त…

1 दिवस ago

ओबीसींच्या स्वतंत्र जनगणना कॉलमसाठी वडेट्टीवारांचा एल्गार! २ नोव्हेंबरला भारत बंद, १५ नोव्हेंबरला दिल्लीत शक्तिप्रदर्शन

नागपूर घोषणापत्र जाहीर; १८ राज्यांतील ओबीसी संघटनांची एकजूट, ‘नॅशनल ओबीसी न्याय मोर्चा’ची स्थापना नागपूर: जनगणनेत…

1 दिवस ago

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क; सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांना मतदानाचे आवाहन

बारामती: श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजितदादा…

1 दिवस ago