मुख्य बातम्या

शिरुरचे PI विनोद पाटील यांच्यासाह डीबी पथकाची धडाकेबाज कारवाई

तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे जप्त 

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याचा कारभार हाती घेताच पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांनी गुन्हेगारांवर वचक बसविण्यास सुरुवात केली असुन पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने अवैध शस्त्र बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक करत त्यांच्या ताब्यातुन तीन गावठी बनावटीची पिस्तुले आणि चार जिवंत काडतुसे असा सुमारे १ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईमुळे शिरुर तालुक्यातील अवैध शस्त्र व्यवहारावर मोठा आळा बसला असून पोलीस दलाच्या सतर्कतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि १४ जून २०२६ रोजी रात्री शिरुर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण आणि स्थानिक गुन्हे पथक हद्दीत गस्त घालत असताना पोलीस अंमलदार नितेश थोरात यांना गोपनीय बातमीदारामार्फत विजय उर्फ कोयत्या गोविंद शेंडगे (वय ३१, रा. आमदाबाद, ता. शिरुर) हा इसम न्हावरे गावच्या हद्दीत न्हावरे-तळेगाव ढमढेरे रस्त्यालगत पिस्तुल बाळगून फिरत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.

या माहितीची तत्काळ दखल घेत पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण यांच्यासह पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, निखील रावडे व अजय पाटील यांनी न्हावरे गावातील मंडल अधिकारी कार्यालयासमोरील परिसरात सापळा रचला.

कमरेला पिस्तुल, खिशात जिवंत काडतुसे…

पोलीस पथकाने संशयित विजय उर्फ कोयत्या शेंडगे यास ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे आढळून आली. त्यानंतर आरोपीविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

चौकशीत उघडकीस आला दुसरा आरोपी…

त्यानंतर पोलिसांनी विजय शेंडगे याची कसून चौकशी केली असता त्याने बापू कोंडीबा पारखे (वय ३१, रा. सरकेवस्ती, निमोणे, ता. शिरुर) याच्याकडे आणखी दोन पिस्तुले व दोन जिवंत काडतुसे दिल्याची कबुली दिली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत बापू पारखे याच्याकडून दोन गावठी पिस्तुले आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली.यामुळे या कारवाईत एकूण तीन गावठी पिस्तुले व चार जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत.

सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न…

अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी विजय उर्फ कोयत्या शेंडगे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खून, जबरी चोरी, विनयभंग आणि मारहाण यांसारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे शिरुर व शिक्रापुर पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे या आरोपींचा अवैध शस्त्र व्यवहाराशी आणखी संबंध आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

१८ जूनपर्यंत पोलीस कोठडी…

या दोन्ही आरोपींना शिरुर न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना १८ जून २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असून अवैध शस्त्र पुरवठा साखळी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई…

हि कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ शुभम कुमार, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले आणि पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, पोलीस हवालदार अक्षय कळमकर तसेच पोलीस अंमलदार नितेश थोरात, विजय शिंदे, निरज पिसाळ, निखील रावडे, सचिन भोई, अंबादास थोरे, रविंद्र काळे, अजय पाटील आणि दादाराव नागरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला; बिगर-काश्मिरी मजुरावर गोळीबार, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

सुरक्षा दलांचे मोठे सर्च ऑपरेशन सुरू; हल्लेखोरांचा शोध सुरू जम्मू काश्मीर: जम्मू-काश्मीरमधील दक्षिण काश्मीरच्या कुलगाम…

10 मिनिटे ago

सिंहस्थातून घडणार पुढील १०० वर्षांचा नाशिक; ३२ हजार कोटींच्या विकास आराखड्याची शिंदेंची घोषणा

स्वतंत्र प्राधिकरण, स्वतंत्र कायदा, २०२७ सिंहस्थासाठी अत्याधुनिक नियोजन; १२ कोटी भाविकांच्या व्यवस्थापनाची तयारी मुंबई: सिंहस्थ कुंभमेळा…

13 मिनिटे ago

जनतेच्या विश्वासाचा सन्मान करत महायुती सरकार स्थापन; विकासालाच प्राधान्य; दिनेश शिंदे

२०१९ च्या जनादेशाचा सन्मान, २०२२ मधील राजकीय बदल आणि विकासाभिमुख प्रशासनावर भर मुंबई: २०१९ च्या विधानसभा…

24 मिनिटे ago

अण्णाभाऊ साठे जयंतीकडे सांस्कृतिक विभागाची पाठ?; विशेष कार्यक्रम नसल्याने कलाक्षेत्रात नाराजी

मुंबई: संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला आपल्या लेखणीतून आणि शाहिरीतून बळ देणारे, वंचित-शोषितांच्या वेदनांना शब्द देणारे लोकशाहिर तथा…

29 मिनिटे ago

लोकमान्यांनी दिला स्वराज्याचा मंत्र, मोदी-शहा भारताला देत आहेत सुरक्षेचा मंत्र; एकनाथ शिंदे

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने अजित डोवाल यांचा गौरव; राष्ट्रसुरक्षा, निर्णायक नेतृत्व आणि गुप्तचर व्यवस्थेचे शिंदेंकडून…

32 मिनिटे ago

‘विनोबा’ डिजिटल व्यासपीठाचा राज्यभर विस्तार; ३१ लाख विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा लाभ

एससीईआरटी–ओएलएफ सामंजस्य करार; एआय-आधारित मूल्यमापन, शिक्षक सक्षमीकरण आणि पालक सहभागाला चालना मुंबई: राज्यातील शासकीय शाळांमधील शिक्षणाची…

37 मिनिटे ago