CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75?
पुणे: पुण्यातील खराडी परिसरात नवीन कारच्या डिलिव्हरीचा आनंद साजरा करताना वाटण्यात आलेल्या पेढ्यांमुळे अनेक जण आजारी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडगाव शेरी येथील गुरुनानक स्वीट मार्टमधून खरेदी केलेले पेढे खाल्ल्यानंतर अनेकांना उलट्या, जुलाब आणि डिहायड्रेशनचा त्रास झाल्याने काहींना रुग्णालयात दाखल करावे लागले.
मिळालेल्या माहितीनुसार, मोठ्या भावाच्या नवीन कारच्या डिलिव्हरीसाठी कुटुंबीय आणि मित्रमंडळी शोरूममध्ये जमली होती. यावेळी आनंद साजरा करण्यासाठी पेढे वाटण्यात आले. मात्र काही तासांतच उपस्थितांपैकी अनेकांची तब्येत बिघडू लागली. पीडित आसिफ काजी यांनी सांगितले की, त्यांच्या 11 महिन्यांच्या मुलीसह कुटुंबातील सात ते आठ जणांना उलट्या आणि जुलाबाचा तीव्र त्रास झाला. मुलीला गंभीर डिहायड्रेशनमुळे रुग्णालयात दाखल करावे लागले, तर इतरांनाही वैद्यकीय उपचार घ्यावे लागले.
दरम्यान, खराडी आणि वडगाव शेरी परिसरातील इतर काही कुटुंबांनीही गुरुनानक डेरीमधून आणलेल्या पेढ्यांमुळे अशाच प्रकारे आजारी पडल्याचा दावा केला आहे. एका तक्रारदार डॉक्टर महिलेच्या माहितीनुसार, या प्रकारात सुमारे 40 ते 45 जण बाधित झाले असावेत.
घटनेनंतर अन्न व औषध प्रशासन (FDA) तातडीने सक्रिय झाले असून गुरुनानक डेरीचे विक्री केंद्र आणि उत्पादन युनिट सील करण्यात आले आहे. पेढे आणि इतर खाद्यपदार्थांचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. भेसळ, दूषित घटक, निकृष्ट दर्जाचा खवा, स्वच्छतेचा अभाव किंवा जुनी मिठाई यापैकी नेमके कोणते कारण जबाबदार आहे, याचा तपास सुरू आहे.
एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर या प्रकरणातील कारवाईला वेग आला असून तपास अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई होणार आहे. पुण्यातील हा प्रकार सध्या नागरिकांमध्ये चिंतेचा विषय ठरत आहे.
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…
नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…