मुख्य बातम्या

नागरगाव येथे विश्व आयुर्वेद दिनानिमित्त ३ हजार आयुर्वेदिक वृक्षांचे वाटप

न्हावरे (तेजस फडके) नागरगाव (ता.शिरुर) राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष्य मंत्रालय भारत सरकार पुरस्कृत पश्चिम विभागीय औषधी वनस्पती सह सुविधा केंद्र, वनस्पतीशास्त्र विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, बाबुराव दौंडकर स्मारक समिती, रांजणगाव गणपती व भारतीय किसान संघ यांच्या संयुक्त विद्यमाने १० वा विश्व आयुर्वेद दिन मंगळवार २३ सप्टेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या निमित्ताने नागरगाव (ता. शिरुर) येथे आयुर्वेद शास्त्रात वापरल्या जाणाऱ्या औषधी वनस्पतींचे वाटप व वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. या उपक्रमात तब्बल ३ हजार औषधी वृक्षांचे रोपण करण्यात आले. यामध्ये आवळा, हिरडा, बेहडा, त्रिफळा यांसारख्या प्रमुख वनस्पतींसह विड्याचे पान, पानफुटी, मंडूकपर्णी, वेखंड, सीता अशोक इत्यादींचा समावेश होता.

नागरगाव ग्रामपंचायतीच्या विशेष ठरावानुसार “एक गाव-एक औषधी वृक्ष” या संकल्पनेतून नागरगावाला त्रिफळा गाव म्हणून घोषित करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. दिगंबर मोकाट यांनी आयुर्वेदिक वनस्पतींचा आरोग्यावर होणारा प्रभाव तसेच आवळा, हिरडा, बेहडा यांचा वैद्यकीय उपयोग याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी भारतीय किसान संघ प्रांत कोषाध्यक्ष बबन केंजळे, जिल्हा मंत्री सतीश साकोरे, बाबुराव दौंडकर स्मारक समितीचे सदस्य तानाजी राऊत, दत्तात्रय दरेकर, वृक्षप्रेमी योगतज्ज्ञ प्रभाकर जगताप, तसेच रोटरी क्लब शिक्रापुरचे अध्यक्ष संजय तांबे तसेच गावातील सरपंच, ग्रामस्थ व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात औषधी वनस्पतींच्या महत्त्वाची माहिती देणारी पोस्टर्स, पुस्तके व माहितीपत्रके गावकऱ्यांना वितरित करण्यात आली. उपक्रम यशस्वी होण्यासाठी डॉ. टी डी खरात व गौरी यांचे विशेष योगदान राहिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विठ्ठल वाघ यांनी तर आभार सतीश साकोरे यांनी मानले.

Video; शिरुरमध्ये अमोल ज्वेलर्सवर दरोडा; लाखो रुपयांचा ऐवज लंपास

Video; मुसळधार पाऊसात विजेच्या खांबावर लटकावला बॅनर, महावितरण कारवाई करणार का…?

Video; करडे-रांजणगाव अष्टविनायक महामार्गावर अपघात; भरधाव डंपरची घराला धडक

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

11 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

20 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago