मुख्य बातम्या

करडे-कारेगाव रस्त्यावरील विजेचे खांब बनले जाहिरातींचे केंद्र; प्रशासनाचे दुर्लक्ष…?

शिरुर (तेजस फडके) करडे-कारेगाव रस्त्याच्या कडेला उभे असलेले महावितरणचे विजेचे खांब सध्या वीजपुरवठ्यापेक्षा अधिक प्रमाणात जाहिरातबाजीसाठी वापरले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रस्त्यालगतच्या अनेक खांबांवर CCTV कॅमेरे, प्लॉटिंग प्रकल्प, जमीन खरेदी-विक्री तसेच विविध व्यावसायिक जाहिरातींचे फलक मोठ्या प्रमाणावर लावण्यात आले आहेत. यामुळे सार्वजनिक मालमत्तेचा सर्रास गैरवापर होत असून संबंधित विभाग मात्र याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

करडे-कारेगाव मार्ग हा परिसरातील महत्त्वाचा आणि वर्दळीचा रस्ता मानला जातो. रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जाणारा हा प्रमुख मार्ग आहे. मात्र या मार्गावरील अनेक विजेच्या खांबांवर अनधिकृत CCTV आणि जाहिरातींचे होल्डिंग लावलेले आहेत. काही ठिकाणी तर एका खांबावर तीन ते चार जाहिराती लावण्यात आल्याने खांबांचे मूळ स्वरुपच हरवले आहे. विशेष म्हणजे या जाहिरातींमध्ये “अधिकृत प्लॉटिंग”, “NA प्लॉट्स” अशा आकर्षक मजकुराचा वापर करुन ग्राहकांना भुरळ घालण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते.

स्थानिक नागरिकांच्या मते, सार्वजनिक मालमत्तेचा वापर करुन व्यावसायिक प्रसिद्धी मिळविणे हा नियमांचा भंग आहे. संबंधित जाहिरातदारांना कोणाची परवानगी आहे…? महावितरणकडून किंवा ग्रामपंचायतीकडून यासाठी मंजुरी देण्यात आली आहे का…? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. अनेकदा जाहिराती लावण्यासाठी खांबांवर लोखंडी तारा बांधल्या जातात त्यामुळे विजेचा धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच सध्या पाऊस सुरु झाल्यामुळे हि शक्यता जास्तच वाढली आहे.

याशिवाय रस्त्यावर गाडी चालविणाऱ्या वाहनचालकांचे लक्ष विचलित होऊन अपघाताचा धोका वाढत असल्याची तक्रारही नागरिकांनी केली आहे. एका बाजूला प्रशासन स्वच्छता, सौंदर्यीकरण आणि बेकायदेशीर फलक हटविण्याच्या मोहिमा राबवत असताना दुसऱ्या बाजूला सार्वजनिक विजेचे खांब प्लॉटिंग करणाऱ्या जाहिरातदारांच्या ताब्यात गेल्याचे चित्र दिसत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

त्यामुळे महावितरण, ग्रामपंचायत आणि संबंधित प्रशासनाने तातडीने संयुक्त कारवाई करुन अशा अनधिकृत जाहिराती हटवाव्यात, तसेच संबंधित जाहिरातदारांवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

सार्वजनिक मालमत्ता की जाहिरातींचे होर्डिंग…?
कारेगाव-करडे रस्त्यावरील विजेचे खांब सध्या वीजपुरवठ्यापेक्षा जाहिरातबाजीसाठी अधिक उपयोगात येत असल्याचे चित्र आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास उद्या प्रत्येक खांब खासगी जाहिरातींच्या विळख्यात अडकलेला दिसेल, अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे जाहिरातदारांना मोकळे रान न देता त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.

महावितरणच्या विजेच्या खांबाला जर कोणी जाहिरातीचे अनधिकृत बॅनर लावत असतील तर ते बेकायदेशीर आहे. अशा जाहिरात करणाऱ्या आणि त्या जाहिराती लावणाऱ्या दोन्हीही व्यक्तींवर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत.
सुमित जाधव
उपकार्यकारी अभियंता
महावितरण (शिक्रापुर) 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट; राजन पाटलांनंतर बाळराजे पाटलांचे नाव चर्चेत

मुंबई: बदललेल्या सहकार कायद्याच्या तरतुदींमुळे माजी आमदार राजन पाटील यांना आगामी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी…

4 तास ago

फडणवीस-शिंदेंचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही; मनोज जरांगे पाटलांचा सोलापुरातून थेट इशारा

सोलापूर : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा पश्चिम महाराष्ट्र दौरा सुरू असून, सोलापूर…

4 तास ago

गोकुळकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा! म्हैस दूध दरात वाढ

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात ‘गोकुळ’ शी संलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी…

4 तास ago

राज ठाकरेंच्या टीकेला एकनाथ शिंदेंचे विकासाच्या रोडमॅपने उत्तर

नवी दिल्ली: महाराष्ट्राच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’ वेगाने पुढे जात असताना ‘तिसऱ्या मुंबई’च्या विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित…

8 तास ago

शिल्पकलेतील आधुनिक तंत्रज्ञान अन् व्यावसायिक संधींवर मार्गदर्शन; १५० हून अधिक विद्यार्थी-शिल्पकारांचा सहभाग

पुणे : ‘संघटित शिल्पकार संघ, महाराष्ट्र राज्य’ आणि एम.आय.टी. ए.डी.टी. विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष…

8 तास ago

सीमेवर जवानांचे रक्त, महाराष्ट्रातून रक्तदानाची साथ; ‘सिंदूर महारक्तदान’मधून शिंदेंचा राष्ट्रभक्तीचा संदेश

नवी दिल्ली: सीमेवर देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या जवानांच्या त्यागाला सलाम करण्यासाठी महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी रक्तदानातून…

8 तास ago