मुख्य बातम्या

रांजणगाव MIDC फेज तीन मध्ये इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरच्या माध्यमातून रोजगार निर्मिती; उद्योगमंत्री

रांजणगाव गणपती (तेजस फडके): महाराष्ट्रात रांजणगाव औद्योगिक वसाहतीत केंद्र शासनाने इलेक्ट्रॉनिक क्लस्टर प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतलेला असुन त्याच्या इन्फ्रास्ट्रॅक्चरसाठी जवळपास 347 कोटी रुपये हे महाराष्ट्र शासनाने मंजुर केलेले आहेत. 650 कोटीच्या प्रोजेक्टला आधीच जागा दिलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाचा प्लॅग अँड प्ले नावाचा जो प्रकल्प आहे. तो 60 युनिट साठी याठिकाणी सुरु करत असुन त्याला जर चांगला प्रतिसाद मिळाला तर तो पुढे नेऊन त्याला 50 एकर पर्यंत करण्याचा आमचा मानस असल्याचे प्रतिपादन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रांजणगाव येथे सांगितले.

आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील तिसऱ्या टप्यातील करडे येथील औद्योगिक वसाहतीत इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लघु उद्योग सुरू होऊन तरुणांना रोजगार मिळणार आहे. रांजणगाव MIDC तील रांजणगाव इंडस्ट्रिअल असोसिएशन (RIA) च्या कार्यालयात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर (EMC) तसेच चाकण व तळेगाव औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधासंदर्भात आयोजित बैठकीत बोलताना उद्योग मंत्री उदय सामंत बोलत होते.

यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पुणे क्षेत्राचे मुख्य अभियंता नितीन वानखेडे, अधीक्षक अभियंता आर एस गावडे, कार्यकारी अभियंता दिलीप जोगवे, मारुती कालकुटकी, संजय कोतवाड, प्रादेशिक अधिकारी सचिन बारवकर यांसह स्थानिक उद्योग समूहातील प्रतिनिधी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सामंत म्हणाले, पथदिव्यांसाठी 14 कोटी रुपये मंजुर केले असुन विविध प्रकल्पाच्या पायाभूत सुविधांसाठी 50 एकर जागेत हे क्षेत्र वाढवण्याचा अंतर्गत रस्त्यासाठी 15 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तसेच भविष्यात या ठिकाणी हेलिपॅड आणि कामगारांच्या निवासाची सोय करण्यात येईल. तसेच येथील तरुणांनाही रोजगार मिळाल्यास अशा उद्योगांच्या मागे तेथील स्थानिक युवक उभे राहतील असे सांगून इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर प्रकल्प वेळेत पूर्ण करावा अशा सूचना देखील उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

7 तास ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

15 तास ago

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

2 दिवस ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

3 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

3 दिवस ago