क्राईम

शिरूर तालुक्यातून मोटारी चोरी करणारे चेन्नईमधून ताब्यात…

शिरूर (तेजस फडके): स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीणने आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. चोरी गेलेल्या स्विफ्ट व डिझायर कार चेन्नई येथून जप्त करत तीस लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिरूर शहरातून मागील चार महिन्यात स्विफ्ट व डिझायर कार चोरीचे पाच गुन्हे दाखल झाले होते. अचानक सुरू झालेल्या या कार चोरीच्या सत्रात, फक्त स्विफ्ट व डिझायर कार चोरी जात असल्याचे निदर्शनास आले. पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी सदरचे कार चोरीचे गुन्हे उघडकीस आणणेबाबत स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांना सुचना केल्या होत्या. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी स्वतः लक्ष देवून शिरूर विभागाचे कामकाज पाहणारे तपास पथकाला दाखल गुन्हयांचा सखोल तपास करून गुन्हा उघडकीस आणणेबाबत आदेशीत केले होते. सर्व चोरी गेलेली वाहने ही अहमदनगर मार्गे छत्रपती संभाजीनगर कडे जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्याने निष्पन्न झाले.

पोलिस नेहमी गुन्हा घडलेनंतर चोरी करणारे चोरांचा शोध घेतात व मुद्देमाल हस्तगत करतात. परंतु यावेळी पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी मार्गदर्शन व सुचना करून चोरीच्या गाडया कोणत्या राज्यात आहेत, याबाबत त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळविली. चोरी गेलेली वाहने तामिळनाडू राज्यातील चेन्नई शहरात असल्याची माहिती मिळाल्याने शिरूर विभागाचे तपास पथक चेन्नई येथे पाठवले.
१) राजा कल्याण सुंदराम रा. पावेदसराई मासई नगर तांबरम चेन्नई
२) रविंद्रम गोपीनाथम रा. नॉर्थ पोलिस क्वॉर्टर, वेल्लूर,
३) यादवराज शक्तीबेल रा. गांधी स्ट्रीट मुदीचूर तांबरम चेन्नई यांना ताब्यात घेवून एक डिझायर कार हस्तगत केली. त्यांच्याकडे मिळून आलेली कार
४) आर सुधाकरण रा. वेंडलूम कांचीपुरम चैन्नई याने दिली होती. त्यास पुणे ग्रामीण पोलिस चेन्नई मध्ये असलेबाबत चाहूल लागल्याने तो चेन्नई सोडून गेला असल्याचे समजले. गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे आर सुधाकरण यास शाहगढ जालना परीसरातून ताब्यात घेतले. त्याच्याकडे तपास केला असता, त्याने मागील चार महिन्यात एकूण दहा गाड्या खरेदी केल्या असल्याचे सांगितले. त्यास विश्वासात घेवून त्याच्यामार्फतीने तीन चारचाकी वाहने हस्तगत केली आहेत.

चेन्नई परीसरात विक्री केलेल्या चार कार एकूण तीस लाख रूपये किंमतीच्या त्यामध्ये दोन स्विफ्ट, दोन डिझायर कार हस्तगत करून शिरूर पो. स्टे. कडील तीन गुन्हे तसेच कोतवाली पोलिस स्टेशनकडील एक गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपी आर सुधाकरण याने खरेदी केलेली वाहने ही त्यास कोणी दिली आहेत, अगर आरोपी आर सुधाकरण गाडया चोरी करताना होता का? याबाबत पोलिस तपास करत असून, चोरी करणारे आरोपी हे तामिळनाडू व महाराष्ट्रातील आंतरराज्यीय आरोपी एकत्रित येवून लॅपटॉप मधील सॉफ्टवेअर वापरून कार अनलॉक करून स्विफ्ट व डिझायर कार चोरी करत असलेबाबत सांगितले आहे. आरोपी सध्या शिरूर पोलिस स्टेशनचे ताब्यात पोलिस कस्टडी मध्ये आहेत. स्थानिक गुन्हे शाखेने मागील महिन्यात ५० चोरीच्या मोटार सायकल हस्तगत करत बारा आरोपींना अटक करून ३९ गुन्हे उपडकीस आणले आहेत.

सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलिस अधीक्षक मितेश घट्टे, पुणे विभाग यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सपोनि महादेव शेलार, पोसई गणेश जगदाळे, सफौ, तुषार पंदारे, पोहवा सचिन घाडगे, पोहवा राजू मोमीण, पोहवा जनार्दन शेळके, पोहवा योगेश नागरगोजे, पोहवा अजित भुजबळ, पोहवा दिपक साबळे, पोहवा मंगेश थिगळे, पोना संदीप वारे, पोना अमोल शेडगे, पोना मंगेश भगत, पोकों अक्षय नवले, भापोकों अक्षय सुपे, चापोकों दगडू विरकर यांनी केली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठे फेरबदल; युवक संघटनेत शहरी-ग्रामीण अध्यक्षपदांची नवी रचना

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षात संघटनात्मक पातळीवर महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे…

4 तास ago

‘दयाबेन’च्या पुनरागमनाची पुन्हा चर्चा; 18 वर्षे पूर्ण होताच भावूक झाले जेठालाल आणि पोपटलाल

दिशा वाकानीच्या कमबॅकची व्यक्त केली इच्छा; 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या 18 वर्षांच्या सेलिब्रेशनमध्ये कलाकारांच्या…

4 तास ago

ऑगस्ट महिन्याची सुरुवात संकष्टी चतुर्थीने; श्रावणात सण-उत्सवांची रेलचेल, जाणून घ्या संपूर्ण यादी

ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभासोबतच धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणाला अधिक रंग चढला आहे. हिंदू पंचांगानुसार हा महिना…

4 तास ago

‘तारिणी’मध्ये मोठा ट्विस्ट! युवराजसमोर येणार गुलाबचा बॉस; डॉक्टर कामतवर संशय गडद

मुंबई : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तारिणी मध्ये कथानकाने पुन्हा एकदा थरारक वळण घेतले आहे.…

5 तास ago

महाराष्ट्रात डिजिटल प्रॉपर्टी कार्डची तयारी; मालमत्ता व्यवहार होणार अधिक सुरक्षित आणि पारदर्शक.

मुंबई : राज्यातील जमिनीच्या आणि मालमत्तेच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता आणि मालकी हक्क अधिक बळकट करण्यासाठी…

5 तास ago

अनेक आजारांवर एरंडेल तेल गुणकारी

रात्रीचं जागरण, अवेळी झोपणं, उठणं, यामुळे पित्त होणं, पोट साफ न होणं, अपचन, बद्धकोष्ठता, उष्णता…

5 तास ago