मुख्य बातम्या

शिरूर तहसिलदारांवर चुकीचे व बिनबुडाचे आरोप; सामाजिक कार्यकर्त्यांनी केली पाठराखण

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथील माती उपसा प्रकरण सध्या तालुव्यात चांगलेच गाजत आहे. या प्रकरणात शेतजमिनीतील माती गावातील लोकांनी चोरून नेल्याचा आरोप करत अॅड. फडके यांनी थेट तहसिलदार कार्यालयात तक्रार दाखल केली होती. तहसिलदारांनी मंडल आधिकारी, तलाठी यांना पंचनामा कराण्याचे आदेश दिले होते. त्यांनी पंचनामा करून अज्ञात व्यक्तीच्या नावाने पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला होता.व त्यानंतर अँड फडके यांनी शिरूर पोलीस स्टेशन येथे माती उपसा केल्या प्रकरणी गावातील चार व्यक्तींच्या नावे गुन्हा दाखल केला होता. मात्र, या प्रकरणाचा गैरवापर करत काही शिदोंडीच्या बड्या राजकीय नेत्यांनी गावातील राजकीय आकसापोटी खोट्या माहितीच्या आधारे भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे साहेबांना निवेदन सादर करत तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांची बदनामी करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

तहसिलदार म्हस्के यांची कारकीर्द ठळक कामगिरीने उजळलेली असून बाळासाहेब म्हस्के यांनी शिरूर तहसिलदार पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर तालुक्यात प्रशासनाच्या कामकाजाला नवे बळ मिळाले आहे. त्यांनी गेल्या काही महिन्यांत तब्बल अंदाजे २०० हून अधिक शिव व पानंद रस्ते खुल्या करून शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मार्ग मोकळा केला आहे.

यासोबतच, १५५ ची चुक दुरुस्ती, रस्ता व पुर्नवसन केसेस, वतन जमिनीच्या परवानगी यासारख्या अनेक प्रलंबित प्रशासकीय विषयांवर त्यांनी तातडीने कारवाई करून न्याय दिला आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक वर्षांपासून रखडलेल्या फाईली मार्गी लागल्या असून शेतकरी, ग्रामीण जनता आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीचे खुलेआम कौतुक केले आहे.

तहसिलदार म्हस्के हे नियम, प्रामाणिकपणा व पारदर्शक कारभाराचे उदाहरण ठरले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप हे केवळ व्यक्तिगत व राजकीय फायद्यासाठी प्रेरित असून तथ्यहीन असल्याचे मत रस्ता चळवळीचे प्रणेते शांताराम पानमंद, सामाजिक कार्यकर्ते शरद उघडे,अल्ताफ तांबोळी, मनसेचे अविनाश घोगरे यांनी व्यक्त केले आहे.

एकीकडे प्रशासनातील पारदर्शकता व गतिमान कामासाठी ओळख निर्माण करणाऱ्या अधिकाऱ्यांवर अशी बदनामीकारक मोहीम राबवणे अत्यंत दुर्दैवी आहे. योग्य चौकशी झालीच पाहिजे, मात्र ती सत्य व न्यायाच्या आधारावर झाली पाहिजे, असा सूर सध्या शिरूर तालुक्यात उमटत आहे. यापुर्वी तहसिल कार्यालयाला पुर्णवेळ तहसिलदार मिळत नव्हते.त्यामुळे त्या काळापासून नागरीकांची बरीचशी कामे रखडली होती. तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी शिरूर तहसिल दार पदाचा चार्ज घेतल्यानंतर प्रलंबित कामासह अनेक कामे तातडीने मार्गी लावले आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

10 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

10 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

10 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

14 तास ago