शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर. तालुक्यातील पिंपरखेड येथील बोंबे वस्तीवर जाणारा शेतरस्ता दीड वर्षांपासून वादग्रस्त ठरला होता. मात्र महसूलमंत्री व शासनाने शेतरस्ते खुले करण्याच्या मोहिमेसह शिव पाणंद शेत रस्ते चळवळीच्या पुढाकारामुळे अखेर हा शेतरस्ता खुला झाला. विशेष म्हणजे, सुरुवातीला मोठा विरोध असतानाही कसलाही पोलिस बंदोबस्त नसताना समन्वय साधत तणाव कमी करुन प्रशासनाने व चळवळीच्या कार्यकर्त्यांनी रस्ता खुला केला.
शिरुरचे तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांनी २६ सप्टेंबर २०२५ रोजी या रस्त्याबाबत आदेश दिला होता. अर्जदाराने कोर्टात कॅव्हेट दाखल केले असतानाही तहसीलदारांचा आदेश अबाधित राहिला आणि महसूल यंत्रणेच्या कठोर भूमिकेमुळे व समन्वयकांच्या मध्यस्थीने रस्ता खुला करण्यास यश आले.
यावेळी मंडलाधिकारी राजेंद्र पोटकुले, ग्राम महसूल अधिकारी सुग्रीव मुंढे, कोतवाल सारिका वरे, शिव पाणंद शेत रस्ते चळवळीचे प्रणेते शरद पवळे, ॲड सुप्रिया साकोरे, ॲड सागर जोरी, ॲड योगेश बारहाते, पत्रकार रवींद्र खुडे तसेच पिंपरखेड व चांडोह येथील पोलीस पाटील यांच्यासह वादी व प्रतिवादी शेतकरी आणि परिसरातील शंभराहून अधिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरुवातीला शेतरस्ता खुला करण्यास विरोध झाला, मात्र शासन व महसूल यंत्रणेची ठाम भूमिका आणि चळवळीच्या समन्वयाने अनेक वर्षांपासून बंद असलेले दोन महत्त्वाचे रस्ते खुले झाले. त्यामुळे शेकडो एकर जमिनींच्या शेतीसाठी मोठा दिलासा मिळाला आहे.
विशेष म्हणजे, प्रतिवादी शेतकऱ्याच्या दाणे भरलेल्या उभ्या मका पिकाचे जेसीबीमुळे होणारे नुकसान होऊ नये म्हणून, शरद पवळे व चळवळीच्या कार्यकर्त्यांनी स्वतः दोन सऱ्या उपटून देत शेतकऱ्याला मदत केली. या संवेदनशील भूमिकेचे सर्व उपस्थित शेतकऱ्यांनी कौतुक केले. हा रस्ता खुला झाल्यानंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत शेतातच मासवडीचे जेवण देऊन सर्वांचा सत्कार केला. या सामूहिक आनंदसोहळ्याचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, नेटकर्यांनी शेतकऱ्यांच्या आनंदाला भरभरुन प्रतिसाद दिला आहे.
रांजणगाव हद्दीत ANTF ची धडक कारवाई; २५ किलो ६४२ ग्रॅम गांजा जप्त, तिघे जेरबंद
रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत २८ किलो गांजा जप्त; महिलेसह एक आरोपी अटक
शिरुर तालुक्यात कंपनीतुन तब्बल १६ लाखांची कॉपर ट्यूब चोरी; औद्योगिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह…?
न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील करडे हद्दीत असलेल्या एस. व्ही. एस. रेफकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे संस्कृती आणि कला यांचा संगम घडवणारा 'सार्वजनिक…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या पथकाने अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली.…
मुंबई (प्रतिनिधी) राज्यात दरवर्षी हजारो तरुण आत्महत्या करत आहेत. हि केवळ आकड्यांची बाब नाही, तर…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात तहसिल प्रशासनाची बेपर्वाई आणि निष्काळजीपणा वेळोवेळी उघड होत असुन तक्रारदाराने…
चेहरा बघून आपल्याकडे चक्क भविष्यवाणी देखील केली जाते, हे फारच कॉमन आहे. इतकंच नाही तर…