मुख्य बातम्या

शिरुरमध्ये उसतोड मजुर पुरविण्याच्या आमिषाने शेतकऱ्याला 12.67 लाखांचा गंडा; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके): उसतोड मजुर पुरविण्याचे आमिष दाखवत शिरुर तालुक्यातील एका शेतकऱ्याकडून तब्बल 12 लाख 67 हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साखर कारखान्याशी लेखी करार असल्याचे भासवत शेतकऱ्याचा विश्वास संपादन करण्यात आला. मात्र, रक्कम स्वीकारल्यानंतर उसतोड मजूर न पुरविता आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी जालना जिल्ह्यातील तिघांविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सुधीर शिवाजी जाधव (वय 50, रा. मांडवगण फराटा, ता. शिरुर, जि.पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार शेषराव गोपीनाथ जाधव, कार्तिक शेषराव जाधव आणि सुंदर उत्तमराव जाधव (सर्व रा. वंजारवाडी, ता. बदनापूर, जि. जालना) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सन 2025-26 च्या गाळप हंगामासाठी उसतोड मजूर उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन आरोपींनी फिर्यादीला दिले होते. यासाठी पराग अ‍ॅग्रो फूड्स अँड अलाइड प्रॉडक्ट्स प्रा. लि. या साखर कारखान्याशी लेखी करार झाल्याचे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन करण्यात आला.

फिर्यादीनुसार, आरोपी शेषराव जाधव यांच्या बँक खात्यावर 10 लाख 67 हजार रुपये, तर कार्तिक जाधव व सुंदर जाधव यांनी प्रत्येकी 1 लाख रुपये स्वीकारले. अशा प्रकारे आरोपींनी एकूण 12 लाख 67 हजार रुपयांची रक्कम घेतली. मात्र, त्यानंतर उसतोड मजूर उपलब्ध करुन दिले नाहीत. तसेच स्वीकारलेली रक्कमही परत न केल्याने फिर्यादीची आर्थिक फसवणुक झाली. हि घटना 24 जुलै ते 1 ऑक्टोबर 2025 या कालावधीत घडली. याप्रकरणी 29 जून 2026 रोजी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्याचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिलीप पवार करीत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

1 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

1 दिवस ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

1 दिवस ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

1 दिवस ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

2 दिवस ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

2 दिवस ago