मुख्य बातम्या

शिंदोडीत रेकॉर्डवरील गुन्हेगारांची दहशत दाखवत सर्रास विटभट्ट्यांना बेकायदेशीर मातीपुरवठा महसुल-पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील शिंदोडी गावात शेतीच्या नावाखाली सर्रास विटभट्ट्यांना बेकायदेशीर मातीपुरवठा उघडपणे सुरु असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून होत आहे. गावातीलच एका मातीचोर रेकॉर्डवरील गुंडाना गावात आणुन त्यांच्या दहशतीच्या जोरावर घोड नदीतील मातीचे उत्खनन करुन विटभट्ट्यांना मातीचा पुरवठा सुरु असुन शिरुरचा महसुल विभाग आणि पोलिस प्रशासन याकडे जाणीवपुर्वक कानाडोळा करत असल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. 

शिंदोडी येथील घोडनदीपात्रात दिवसरात्र जेसीबी, पोकलेन आणि डंपरच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणावर मातीचा उपसा केला जात असुन शेतीच्या नावाखाली प्रत्यक्षात व्यावसायिक स्वरुपात मातीची विक्री केली जात असल्याने शासनाचा लाखों रुपयांचा महसूल बुडत असून पर्यावरणाचेही मोठे नुकसान होत आहे. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, या प्रकाराला विरोध करणाऱ्यांवर दबाव आणला जातो. त्यामुळे अनेक नागरिक उघडपणे तक्रार करण्यास घाबरत आहेत. 

प्रशासन जाणीवपुर्वक दुर्लक्ष करतंय कां…?

शिंदोडी गावातील हा मातीचोर स्वतःच्या फायद्यासाठी बाहेरील गावातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा दहशत करण्यासाठी वापर करत असल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वात गंभीर बाब म्हणजे, एवढ्या मोठ्या प्रमाणावर सुरु असलेला माती उपसा महसूल विभाग आणि पोलिसांच्या नजरेतून कसा सुटतो, असा सवाल उपस्थित होत आहे. संबंधित यंत्रणा ‘चिरीमिरी’ घेऊन या सगळ्या प्रकाराकडे जाणूनबुजून डोळेझाक करत आहेत का…? असा संशयही ग्रामस्थ व्यक्त करत आहेत.

एखादा जीव गेल्यानंतरच कारवाई होणार का…? 

शिंदोडी गावात शेतीच्या नावाखाली विटभट्टीसाठी चाललेला बेकायदेशीर माती उपसा, वाहतूक आणि विक्रीचे हे रॅकेट तातडीने उद्ध्वस्त केले जाणार की नाही…? एखाद्याचा जीव गेल्यावरच प्रशासन जागे होणार आहे का…? असा प्रश्न ग्रामस्थांना पडला असुन जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करुन संपुर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, संबंधितांवर गुन्हे दाखल करुन यंत्रसामग्री जप्त करावी आणि या प्रकाराला पाठीशी घालणाऱ्यांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. 

(क्रमश:) 

शिरुर; शिंदोडीत विटभट्ट्यांसाठी बेकायदेशीर मातीउपसा; महसूल-पोलिसांचे जाणीवपुर्वक दुर्लक्ष…?

शिरुर बाजार समिती निवडणुक; अशोक पवारांवर टिका करणाऱ्या माऊली कटकेंनी दिड वर्षात काय केले…?

शिरुरमध्ये उसतोड मजुर पुरविण्याच्या आमिषाने शेतकऱ्याला 12.67 लाखांचा गंडा; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रामदास आठवले सामाजिक न्यायाची मशाल; एकनाथ शिंदेंकडून तोंडभरून कौतुक

मुंबई : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या केंद्रीय मंत्रिपदाच्या दशकपूर्ती सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ…

2 तास ago

आदिवासी आश्रमशाळांमध्ये दोन वर्षांत ५८४ विद्यार्थ्यांचा मृत्यू; गंभीर आजारांमुळे २७३ बळी

मुंबई : महाराष्ट्रातील आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.…

2 तास ago

पुणेकरांच्या आवडत्या बर्गर किंगसह सयाजी हॉटेल आणि झेप्टोवर FDA ची कारवाई; अन्न परवाने निलंबित

पुणे : पुणेकरांच्या आवडीच्या खाद्यपदार्थांच्या ठिकाणांसह ऑनलाईन किराणा वितरण केंद्रावर अन्न व औषध प्रशासनाने (FDA)…

2 तास ago

20 वर्षांत 40 बदल्या! तुकाराम मुंढेंनाही मागे टाकणाऱ्या IPS अधिकारी डी. रूपा मौदगिल यांची धडाकेबाज कारकीर्द

मुंबई: प्रशासकीय सेवेत प्रामाणिक आणि कडक शिस्तीच्या अधिकाऱ्यांना अनेकदा राजकीय दबाव आणि वारंवार होणाऱ्या बदल्यांचा…

12 तास ago

चाकण एमआयडीसीतील समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील;  सुनेत्रा पवार

रस्ते, वाहतूक अन् पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक; उद्योग प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा; प्रशासनाला…

20 तास ago

सुखबीर बादलांवर हल्ला करणारा जसपालसिंग कोण? पुण्यात वकिली, दोन वर्षांपासून गुरुद्वारात सेवा

नांदेड : शिरोमणी अकाली दलाचे प्रमुख आणि पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये…

20 तास ago